WagonR खरेदी करण्याचा विचार आहे? ऑगस्टमध्ये मिळतोय ₹१.२१ लाखांचा डिस्काउंट, पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:21 IST2025-08-07T17:17:00+5:302025-08-07T17:21:39+5:30
WagonR चे नवीन मॉडेल आल्यापासून याच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

मारुती सुझुकी इंडियाच्या पोर्टफोलिओमध्ये WagonR ही सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. गेल्या अनेक दशकांपासून या कारने सामान्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवीन मॉडेल आल्यापासून तर तिची विक्री झपाट्याने वाढली आहे. तुम्हीदेखील ही कार विकत घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला मोठा लाभ होऊ शकतो.
या कारची एक्स-शोरूम किंमती ५.७९ लाख रुपयांपासून ते ७.६२ लाख रुपयांपर्यंत आहेत. कंपनी या महिन्यात, म्हणजेच ऑगस्टमध्ये कारवर १.२१ लाख रुपयांची मोठी सूट देत आहे. ही कार खरेदी केल्यावर कंपनी ६०,००० रुपयांच्या रोख सवलतीसह ६०,७९० रुपयांचा कॉम्प्लिमेंटरी किट देखील देत आहे.
मारुती सुझुकी WagonR मध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात नेव्हिगेशनसह ७-इंचाचा स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लाउड-बेस्ड सर्व्हिस, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, AMT मध्ये हिल-होल्ड असिस्ट, चार स्पीकर्स, माउंटेड कंट्रोल्स, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीअरिंग व्हील आहे.
या कारमध्ये तुम्हाला दोन इंजिन पर्याय मिळतात. पहिले १.०-लिटर ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे २५.१९ किमी प्रति लिटर मायलेज देते, तर CNG व्हेरिएंट ३४.०५ किमी/किलो मायलेज देते. याशिवाय, याचे १.२-लिटर ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी २४.४३ किमी प्रति लिटर मायलेज देते.
टीप: आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर मिळालेल्या माहितीच्या आधारे सवलतींचा उल्लेख केला आहे. ही सवलत तुमचे शहर आणि डीलरनुसार कमी-अधिक प्रमाणात असू शकते.