पाकिस्तानातही आहे भारतातील प्रसिद्ध WagonR ला मोठी मागणी; पण किंमत पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 02:44 PM2022-01-11T14:44:01+5:302022-01-11T14:50:40+5:30

WagonR या कारचा पाकिस्तानातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश आहे.

भारतात फॅमिली कार म्हणून WagonR या कारवा सर्वाधिक पसंती मिळालेली आहे. याच WagonR या कारचा पाकिस्तानातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समावेश आहे. पाकिस्तानात ही सर्वाधिक विक्री होणारी पाचवी कार आहे.

स्वस्त भाग, चांगली रिसेल व्हॅल्यू यामुळे ही कार ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. सुझुकी वॅगनआर गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानमधील सर्वात लोकप्रिय हॅचबॅकपैकी एक आहे. ही कार पाकिस्तानमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसह येते.

2021 मध्ये WagonR ने 12,659 युनिट्सची विक्री केली, ज्यामुळे ते पाकिस्तानमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक बनली. पाकिस्तानमध्ये WagonR ची किंमत 17.6 लाख (पाकिस्तानी रुपये) ते 20.2 लाख (पाकिस्तानी रुपये) दरम्यान आहे.

पाकिस्तानमध्ये विकल्या जाणार्‍या WagonR ची किंमत भारतात विकल्या जाणार्‍या WagonR पेक्षा खूप जास्त आहे. भारतात WagonR ची किंमत 4.93 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

भारतातील या कारच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाल्यास, यात दोन पेट्रोल इंजिन व्हेरिअंट्स उपलब्ध आहेत. यामध्ये 1 लिटर आणि 1.2-लिटर पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो. 1 लिटर पेट्रोल इंजिन 21.79 kmpl पर्यंत मायलेज देते आणि 1.2 लिटर पेट्रोल इंजिन 20.52 kmpl पर्यंत मायलेज देते. यामध्ये CNG व्हेरिअंटदेखील उपलब्ध आहे. ही कार 32.52 किमी/किलो मायलेज देते.

भारतात विक्री होत असलेल्या नव्या WagonR मध्ये सात इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आली आहे. याणध्ये अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो सपोर्ट, ORVM, स्प्लिट फोल्डिंग रिअर बेंच, ड्युअल एअरबॅग्स, पॉवर स्टेअरिंग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, पॅसेंजर्स एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

WagonR सीएनजीचं मायलेज 32.52 किमी इतकं आहे. WagonR भारतात 4.93 लाख रुपयांपासून 6.45 लाख रुपयांपर्यंत (एक्स शोरुम) उपलब्ध आहे. भारतातही ही कार अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.