Driving Licence: ड्रायविंग लायसन्ससाठी टेस्ट नाही; ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच मिळणार लायसन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:04 PM2021-02-08T18:04:08+5:302021-02-08T18:17:18+5:30

Driving Licence: आता ट्रेनिंगनंतरच मिळू शकेल लायसन्स

ड्रायव्हिंग लायसन्स बनण्याची इच्छा असलेल्या तरूणांची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची अट आता संपण्याची चिन्ह आहेत.

याव्यतिरिक्त लायसन्ससाठी लागणारा महिन्यांचा कालावधीही कमी होण्याच्या मार्गावर आहे. रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयानं ड्रायविंग ट्रेनिंग सेंटर्सबाबत एक ड्राफ्ट तयार केला आहे.

सरकारच्या या ड्राफ्टचं नियमामध्ये रूपांतर झाल्यानंतर कोणत्याही त्रासाशिवाय लोकांना लायसन्स तयार करता येणार आहे.

रस्ते वाहतूनक आणि महामार्ग मंत्रालयानं ड्रायव्हर ट्रेनिंग सेंटर्सला मान्यता देण्यासंदर्भात एक अधिसूचनेचा मसुदा तयार केला आहे.

सरकार या माध्यमातून नागरिकांना चांगलं ड्रायविंग ट्रेनिंग देऊ इच्छित आहे.

कोणताही व्यक्ती या केंद्रांवर यशस्वीरित्या आपली टेस्ट पूर्ण करेल तर त्याला ड्रायविंग लायसन्ससाठी अर्ज करताना द्यावी लागणारी टेस्ट द्यावी लागणार नसल्याची तरतूद यात करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे ट्रान्सपोर्ट क्षेत्रालाही मदत मिळणार आहे. कारण त्यांना विशेष रूपानं प्रशिक्षित ड्रायव्हर मिळणार आहेत.

तसंच चांगल्या ड्रायव्हर्समुळे रस्ते अपघाताचं प्रमाणही कमी होईल. सध्या हा मसुदा मंत्रालयाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आला असून त्यासंदर्भात सूचना मागवण्यात आल्या आहेत.

सध्या ड्रायविंग लायसन्स तयार करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याअंतर्गत अर्ज करणाऱ्यांना टेस्टसाठी ऑनलाईन अप्लाय करावं लागतं.

काही महिन्यांच्या नंतर त्यांना टेस्टसाठी बोलावलं जातं. यानंतर लायसन्स मिळण्यातही मोठा कालावधी जातो. अशातच हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर ड्रायविंग टेस्टची समस्या संपणार आहे.