ना पेट्रोल दराचं टेन्शन, ना बॅटरी डिस्चार्जची भीती; ३० हजारांहून स्वस्त E-Cycle

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 05:31 PM2022-08-19T17:31:27+5:302022-08-19T17:34:20+5:30

बाजारात इलेक्ट्रिक मोटारसायकलसह इलेक्ट्रिक स्कूटरचे अनेक पर्याय आहेत, जे वेगवेगळ्या किंमतींमध्ये उपस्थित आहेत. चांगल्या आणि मजबूत फीचर्ससह येणाऱ्या स्कूटरसाठी १ लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो, पण आज आम्ही तुम्हाला एका स्वस्त इलेक्ट्रिक सायकलबद्दल सांगणार आहोत.

ही इलेक्ट्रिक बाईक सायकल एका चार्जमध्ये २०-३० किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. यासाठी महाग पेट्रोलही लागणार नाही आणि बॅटरी डिस्चार्ज झाल्यानंतरही पॅंडल वापरता येणार आहे. अगदी कमी किमतीत सहज खरेदी करता येत असल्याने तरुणांमध्ये इलेक्ट्रिक सायकल खूप लोकप्रिय होत आहे.

यासोबतच त्यावर सुलभ हप्त्यांचा पर्यायही देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक सायकलच्या मदतीने शाळा, ट्यूशन आणि ऑफिसला जाता येते. Hero Lectro मध्ये Hero Lectro C3 सायकल आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर ३० किमी अंतर कापू शकते.

या सायकलची बॅटरी सहज आणि कमी वेळेत चार्ज करता येते. त्याचा टॉप स्पीड २५ किमी प्रति तास आहे. हा शहरातील अंतर्गत प्रवासासाठी योग्य पर्याय ठरू शकतो. herolectro.com वर दिलेल्या माहितीनुसार, त्याची किंमत २८,९९९ रुपये आहे.

BattRE इलेक्ट्रिक मोबिलिटी न्यूट्रॉन मोटरसायकल २९९९० रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. यामध्ये डिजिटल कन्सोल आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने डबल डिस्कचा वापर करण्यात आला आहे. ही मोटरसायकल 8AH बॅटरीसह येते.

ही उच्च कार्बन स्टीलपासून बनवण्यात आली आहे. यासोबतच ५ लेव्हल पँडल असिस्टंटची वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. यात 3 amps फास्ट चार्जर आहे. Nuze i1 देखील Flipkart वरही यादीत आहे. आणि त्याची किंमत २७,५९९ रुपये आहे. ती एका चार्जवर २८ किमी अंतर कापू शकते, तर त्याचा टॉप स्पीड ताशी २५ किमी आहे. याचे टायर २६ इंचाचे आहेत. चार्जिंगसाठी ४ तास लागतात.

गेल्या एक-दोन वर्षात, भारतातील दुचाकी क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. इलेक्ट्रिक बाइक्स, इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक सायकली या सेगमेंटमध्ये आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्सप्रमाणेच बाजारात अनेक ई-सायकल उपलब्ध आहेत.

काही कंपन्या रिमूव्हेबल बॅटरी देत ​​आहेत, तर अनेक कंपन्या बॉडीमध्ये इनबिल्ट बॅटरी पॅक देत आहेत. Hero Lectra सारख्या कंपनीची सायकल एका चार्जमध्ये ६४ किमी पर्यंत ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने ही सायकल ड्युअल डिस्क देखील वापरली आहे.

अलीकडेच नवीन स्टार्ट-अप व्होल्ट्रॉन(Voltron) आहे, ज्याच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या दोन इलेक्ट्रिक सायकल आहेत. त्यांचं वैशिष्टे लांब पल्ल्याचं आहे. ही मेड इन इंडिया इलेक्ट्रिक सायकल तुम्हाला एका चार्जवर १०० किमी पर्यंत नेऊ शकते. ई-सायकलचा कमाल वेग २५ किलोमीटर प्रति तास आहे

व्होल्ट्रॉन मोटर्सचं पहिले मॉडेल VM 50 आहे, ज्याची किंमत ३५००० रुपये आहे. यानंतर हाय-एंड मॉडेल - VM 100, ज्याची किंमत ३९,२५० रुपये आहे. ही सायकल पूर्ण चार्ज केल्यावर ७५ ते १०० किमीची रेंज देऊ शकते आणि तिचा टॉप स्पीड २५ किमी प्रतितास आहे. सायकलमध्ये लिथियम फॉस्फेटची बॅटरी उपलब्ध आहे. हा बॅटरी पॅक २ ते ५ तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते आणि पूर्ण चार्ज करताना सरासरी ४ रुपये विजेचा वापर होतो.