दमदार हायब्रिड इंजिन अन् ADAS सेफ्टीसह येतेय नवीन Renault Duster; जाणून घ्या किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 17:32 IST2026-01-20T17:25:06+5:302026-01-20T17:32:27+5:30

Creta-Seltos सारख्या SUV's ला टक्कर देण्याची तयारी.

फ्रेंच ऑटोमोबाईल कंपनी Renault आपली आयकॉनिक SUV Duster भारतात पुन्हा एकदा नव्या आणि अधिक प्रगत अवतारात सादर करण्याच्या तयारीत आहे. 2026 Renault Duster चे लॉन्च 26 जानेवारी 2026 रोजी होण्याची शक्यता असून, ही SUV थेट Hyundai Creta, Kia Seltos आणि Maruti Grand Vitara यांसारख्या लोकप्रिय मध्यम आकाराच्या SUVs ला टक्कर देणार आहे.

नव्या Duster मध्ये अधिक स्टायलिश डिझाइन, प्रगत टेक्नॉलॉजी आणि मजबूत सेफ्टी फीचर्स देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत. 2026 Renault Duster चे बाह्य डिझाइन पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक आणि दमदार असेल. यात स्लीक LED हेडलाइट्स, आयब्रो-शेप DRLs, कनेक्टेड LED टेललाइट्स आणि C-पिलरवर दिलेले डोअर हँडल्स SUV ला कूपे-स्टाइल प्रीमियम लूक देतात.

भारतीय बाजारासाठी फ्रंट ग्रिल आणि बंपरमध्ये विशेष बदल करण्यात आले असून, गाडीचा रोड प्रेझेन्स अधिक ठळक दिसतो. आकारमानाच्या बाबतीतही ही SUV जुन्या Duster पेक्षा थोडी रुंद आणि लांब असण्याची शक्यता आहे.

नव्या Duster चे केबिन पूर्णपणे आधुनिक करण्यात आले आहे. संभाव्य फीचर्समध्ये, 10.1-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, वायरलेस चार्जिंग, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, याशिवाय Arkamys 3D साउंड सिस्टम, पॉवर्ड ड्रायव्हर सीट आणि अॅम्बियंट लाइटिंगसारखे प्रीमियम फीचर्सही दिले जाऊ शकतात.

2026 Renault Duster मध्ये विविध इंजिन पर्याय अपेक्षित आहेत. 1.3-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन (माइल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजीसह), 1.0-लिटर टर्बो पेट्रोल, 1.6-लिटर फुल हायब्रिड पर्याय मिळतात. ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी AWD/4x4 सिस्टम देण्याचीही शक्यता आहे. गाडी मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशनमध्ये उपलब्ध होऊ शकते.

सेफ्टीच्या दृष्टीने नव्या Duster मध्ये ADAS (Advanced Driver Assistance Systems), 360-डिग्री कॅमेरा, 6 एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) असे अत्याधुनिक फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. या SUV ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹10 लाख ते ₹19 लाख दरम्यान असू शकते.

जर तुम्ही 2026 मध्ये स्टायलिश, सुरक्षित आणि हायब्रिड टेक्नॉलॉजीसह SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर नवी Renault Duster ही Creta–Seltos सेगमेंटमधील एक भक्कम दावेदार ठरू शकते.