नव्या रूपात आली जबरदस्त मायलेज देणारी Splendor Plus, किंमत केवळ इतकीच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 02:06 PM2022-09-20T14:06:36+5:302022-09-20T14:09:23+5:30

पाहा काय आहे खास आणि किती आहे किंमत?

हीरो मोटोकॉर्प (Hero MotoCorp) ने Splendor Plus चा नवीन कलर ऑप्शन सादर केला आहे. मोटारसायकल आता नवीन सिल्व्हर नेक्सस ब्लू कलर ऑप्शनसह देखील येईल.

याशिवाय स्प्लेंडर आधीच ब्लॅक विथ पर्पल, हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, मॅट शील्ड गोल्ड आणि ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड या रंगांमध्ये उपलब्ध होती. एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकलमध्ये 97.2cc एअर-कूल्ड सिंगल-सिलिंडर फ्युअल-इंजेक्टेड इंजिन देण्यात आलंय.

हे इंजिन 8,000 rpm वर 7.9 bhp आणि 6,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन फोर-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. बाइकला स्टार्ट/स्टॉप सिस्टीम, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आणि ड्रम ब्रेक देखील मिळतात. Hero Splendor Plus किंमत 70,658 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

कंपनी पुढील महिन्यात भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन (EV) लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लॉन्चसह, कंपनी इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात प्रवेश करेल.

आपल्या इलेक्ट्रीक वाहनासह पर्यावरण, सोशल आमि ऑपरेशन (ईएसजी) सोल्युशनवर 10 कोटी डॉलर्सच्या गुंतवणूकीसाठी तयार असल्याचं हीरो मोटोकॉर्पनं यापूर्वी सांगितलं होतं. हीरो मोटोकॉर्प आपल्या विडा ब्रँड अंतर्गत उद्योन्मुख ट्रान्सपोर्ट सोल्युशन सादर करण्याची योजना आखत आहे.

Hero MotoCorp 7 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची पहिली इलेक्ट्रीक स्कूटर लॉन्च करणार आहे. देशातील इलेक्ट्रीक टू व्हीलरची वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन कंपनीने या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. Hero MotoCorp ने अद्याप या स्कूटरबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही पण रिपोर्ट्सनुसार, कंपनी ही ई-स्कूटर Vida नावाने सादर करेल. ज्यामध्ये हीरो विडा, विडा ईव्ही, ई विडा अशी नावे दिली जाऊ शकतात.

या स्कूटरच्या लाँचच्या घोषणेपूर्वी कंपनीने या स्कूटरच्या 10 व्या वर्धापनदिनानिमित्त या स्कूटरची झलक दाखवली होती, मात्र आता ही स्कूटर खूप बदल करून लाँच केली जात आहे. बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, रिपोर्ट्सनुसार, कंपनी 3 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक देऊ शकते ज्यामध्ये 2000W BLDC मोटर कनेक्ट केली जाऊ शकते. या बॅटरी पॅकमध्ये सामान्य चार्जिंगसोबत फास्ट चार्जिंगचा पर्यायही दिला जाऊ शकतो.

रेंज आणि स्पीडबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, या स्कूटरची रेंज 75 ते 100 किमी असणार आहे ज्यामध्ये 55 ते 60 किमी प्रतितासचा टॉप स्पीड मिळेल. यासोबतच कंपनी तीन ड्राइव्ह मोड देखील देऊ शकते.