शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

चीनची कंपनी MG Moters, KIA ला टक्कर देणार; नववर्षात भारतात एन्ट्री करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 8:59 AM

1 / 7
2019 चे वर्ष आर्थिक मंदीचे असूनही याच वर्षी भारतीय बाजारपेठेत दाखल झालेल्या MG Moters, KIA या दोन परदेशी कार कंपन्यांनी धूम माजविली आहे. यामुळे टाटा मोटर्सला याचा सर्वाधिक फटका बसला असून हॅरिअर ही एसयुव्ही विक्रीसाठी धडपडत आहे. पण आता एमजी मोटर्स आणि कियाचेही दिवस भरत आले असून त्यांना टक्कर देण्यासाठी चीनची मोठी कंपनी येणार आहे.
2 / 7
एमजी मोटरही चीनच्याच मालकीची कंपनी आहे. आता First Automobile Works (FAW) या मोठ्या कंपनीची Haima Automobile ही उपकंपनी भारतातील ऑटो एक्स्पोमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवणार आहे. कंपनीने याबाबत अधिकृत माहितीही दिली आहे. Haima ही अशासाठी महत्वाची आहे कारण चीनमध्ये या कंपनीच्या इलेक्ट्रीक कारची फॅक्टरी आहे. या फॅक्टरीची क्षमता वर्षाला दीड लाख कार एवढी मोठी आहे.
3 / 7
सध्यातरी या कंपनीने भारतीय बाजारात लाँच केल्या जाणाऱ्या कारबाबत खुलासा केलेला नसला तरीही भारतातील त्यांची सहकारी कंपनी बर्ड इलेक्ट्रीकनुसार ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी इलेक्ट्रीक कारच्या रेंज दाखविणार आहे. बर्ड ग्रुप हा भारतात बीएमडब्ल्यू कारची विक्री करतो.
4 / 7
दुसरीकडे हाईमा कंपनी केंद्रासह राज्य सरकारांसोबत चर्चा करत आहे. ही कंपनी 1988 मध्ये स्थापन झाली होती. या कंपनीच्या ताफ्यात Aishang 360 हॅचबॅक, E3 मिडसाइज सेदान, E5 SUV आणि E7 MPV गाड्या आहेत.
5 / 7
हैनान प्रांतामध्ये कंपनीची फॅक्टरी असून तिथे जपानच्या माझदा कंपनीच्या गाड्यांची Haima Happin या ब्रँडच्या नावे विक्री केली जाते. काही वर्षांपूर्वी पर्यंत ही कंपनी माझदाच्या कार प्लॅटफॉर्मच्या कार बनवत होती. पण आता कंपनी स्वत:च्या प्लॅटफॉर्मवर कार बनवत आहे.
6 / 7
यंदा कंपनीने Haima 8S ही एसयुव्ही लाँच केली होती. ही कार एमजी हेक्टर आणि किया सेल्टॉसला टक्कर देते. या गाडीमध्ये 1.6 लीटरचे T-GDI इंजिन देण्यात आले आहे. ही एसयुव्ही 1 ते 100 किमीचा वेग 8 सेकंदात पकडते.
7 / 7
इनोव्हा क्रिस्टालाही ही कंपनी टक्कर देऊ शकते. 7X MPV ही कार कंपनीने लाँच केली आहे. लांबीलाही क्रिस्टापेक्षा जास्त आहे. तसेच अद्ययावत टचस्क्रीन, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.
टॅग्स :haima automobileहाईमा ऑटोमोबाईलMG Motersएमजी मोटर्सKia Motars Carsकिया मोटर्सTataटाटाToyotaटोयोटाAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार