नितीन गडकरींच्या मंत्रालयातून आदेश निघाले; तुमच्या गाड्यांवर लागणार तीनपैकी एका रंगाचा स्टीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 05:19 PM2021-07-27T17:19:26+5:302021-07-27T17:29:06+5:30

Vehicle sticker color code: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका याचिकेवर मंत्रालयाला हे आदेश दिले होते. यामुळे राज्यांना हे आदेश मानावे लागणार आहेत.

केंद्रीय रस्ते, परिवाहन आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांना आदेश जारी केले आहेत. वाहनांवर इंधनाच्या प्रकारानुसार होलोग्राम आधारित कलर कोडवाले स्टीकर लावण्याचे काम सुरु करण्यास सांगितले आहे. (Fuel Type colour Sticker made mandatory by the Supreme Court)

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी एका याचिकेवर मंत्रालयाला हे आदेश दिले होते. यामुळे राज्यांना हे आदेश मानावे लागणार आहेत.

वाहन कोणत्या इंधनाचे आहे याची लगेचच ओळख पटावी यासाठी त्या वाहनावर इंधन प्रकारानुसार विविध रंगांचे होलोग्राम रंगीत स्टीकर लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

दिल्ली हवा प्रदुषणाच्या प्रश्नावर न्यायालयाला मदत करणाऱ्या वकील अपराजिता सिंह यांनी हा सल्ला दिला होता. प्रदुषणाच्या याचिकेवर हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

सुनावनीदरम्यान, जस्टिस मदन बी लोकूर, जस्टिस एस अब्दुल नजीर आणि जस्टिस दीपक गुप्ता यांच्या बेंचने मंत्रालयाचा आदेश देताना म्हटले होते की वाहनांना इंधन आधारीत रंगाचे स्टीकर लावण्यात यावेत.

यानुसार मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईननुसार हे क्रोमियम बेस्ड सेल्फ डिस्ट्रक्टिव टाईप होलोग्राम स्टीकर असणार आहेत. डीझेलसाठी पाठीमागचा रंग नारिंगी असेल.

पेट्रोल आणि सीएनजी वाहनांसाठी फिकट निळा रंग देण्यात येणार आहे. दिल्लीत आधीच हे स्टीकर लावण्यास सुरुवात झाली आहे.

इलेक्ट्रीक, हायब्रिड वाहनांसाठी हिरव्या रंगाची नंबरप्लेट आणि हिरव्या रंगाचा स्टीकर लावण्यात येणार आहे. हा नियम पहिल्यांदा दिल्लीत लागू करण्यास सांगितले होते.