Monsoon Car Care Tips: पावसाळा अन् अपघाताचे घट्ट नाते...; कार आणि या चार गोष्टी नक्की तपासा, उपयोगी येतील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 03:41 PM2022-07-06T15:41:01+5:302022-07-06T15:44:39+5:30

Monsoon Car Care Tips in Marathi: रस्त्यांवर खड्डे तर वाटच पाहत आहेत. अशावेळी अपघाताची शक्यता अधिक आहे. यामुळे पावसाळा सुरु होताच कारची कोणती काळजी घ्यावी? याच्या काही टिप्स...

भारतात मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसारख्या शहरांत तर पाणी साचू लागले आहे. त्यातून कार चालवावी लागत आहे. अनेकांची कार पाण्यात गेली आहे. रस्त्यांवर खड्डे तर वाटच पाहत आहेत. अशावेळी अपघाताची शक्यता अधिक आहे. यामुळे पावसाळा सुरु होताच कारची कोणती काळजी घ्यावी? याच्या काही टिप्स...

पाण्यामुळे आणि खड्ड्यांमुळे गाडीचे स्पेअर पार्ट खराब होऊ शकतात. यामुळे जर पाऊस पडत असेल आणि तुम्हाला पुढचे काहीच दिसत नसेल तर काय करणार? यासाठी गाडीचे वायपर, काचा, लाईट, टायर आणि ब्रेक हेच कामाला येतात.

पाऊस सुरु होण्यापूर्वीच गाडीच्या टायरची ग्रीप तपासून घ्यावी. त्यासाठी अधिकृत टायरची दुकाने असतात त्यांच्याकडे मीटर असतात त्यावर ते तपासतात. तसेच टायर कुठे कट वगैरे नाहीय ना ते देखील तपासावे. अलायमेंट नीट करून घ्यावी. टायरचे थ्रेड टायरखाली आलेले पाणी काढून टाकण्यास मदत करतात. यामुळे कार घसरण्याचे चान्सेस कमी असतात.

पाऊस सुरु असेल तर त्यामुळे दृष्यमानता कमी होते. यामुळे गाडीच्या लाईट्स, इंडिकेटर्स नीट काम करतात का? फुटले असल्यास काचा बदलून घेणे आदी कामे करावीत. जेणेकरून समोरून किंवा मागून येणाऱ्याला तुमचा अंदाज येईल आणि अपघात होणार नाही.

याचबरोबर गाडीचा वायपर हा खुप महत्वाचा असतो. तो दर पावसाळ्यात बदललेला चांगला असतो. थंडी, उन याचा परिणाम त्या रबरावर होतो. यामुळे तो कडक झाला किंवा त्याच्या खाली काही आले आणि खोडी गॅप पडली तर काचेवरील पाणी हटत नाही, जेणेकरून समोरील दिसणे बाधित होते व अपघाताची शक्यता असले.

पावसाळा असो की उन्हाळा गाडी जमिनीशी फक्त टायरनेच कनेक्ट असते. आणि या टायरला ग्रीप व ब्रेक या दोनच गोष्टी कंट्रोल करू शकतात. यामुळे तुमच्या गाडीचा ब्रेक पावसाळ्यात चांगला लागणारा असायला हवा. ब्रेक जर वेळेत लागले नाहीत तर गाडी घसरण्याची किंवा आदळण्याची शक्यता असते. यामुळे ब्रेक पॅड वेळीच बदलावेत.