इलेक्ट्रिक वाहनावर मोदी सरकारकडून मोठी सूट; तुम्ही घेऊ शकता 'या' 4 कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 11:39 AM2019-07-31T11:39:41+5:302019-07-31T11:43:09+5:30

इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून वाहन खरेदीवर मोठी सूट देण्यात आली. त्यामुळे ऑटो कंपन्यांनीही इलेक्ट्रिक कार उत्पादनाकडे वळू लागल्या आहेत. त्यामुळे अनेक इलेक्ट्रिक कार बाजारात येऊ लागल्या आहेत. सध्याच्या काळात 4 कार बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. टाटा टिगोर(Tata Tigor) - या कारची किंमत 9 लाख 99 हजार आहेत. या कारवर 1 लाख 20 हजार रुपये जीएसटी लागू होतो. सरकारकडून या कारवर देण्यात आलेल्या सूटमुळे 70 हजार रुपयांची बचत होणार आहे.

टाटा टिगोर कार एकदा पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर 142 किमी धावू शकते. 6 तासांत 80 टक्के बॅटरी चार्ज होते. टाटा मोटर्सकडून या कारवर 3 वर्षाची वॉरंटी देण्यात आली आहे.

महिंद्रा E 20 प्लस - ही इलेक्ट्रिक कार सध्या स्वस्त किंमतीत बाजारात आली आहे. या कारची किंमत 5 लाख 50 हजार रुपये आहे. यावर 5 टक्के जीएसटी म्हणजे 27, 500 रुपये कर लागेल.

कंपनीचा दावा आहे की ही कार एकदा चार्ज झाल्यानंतर 110 किमी धावू शकते. तर या कारचं नेस्ट व्हर्जन 140 किमी धावू शकते.

Hyundai Kona - या कारची किंमत 24 लाख रुपये आहे. या कारवर 12 टक्के जीएसटी लागेल.

सध्या भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारचे पर्याय कमी आहेत मात्र पुढील वर्षी अनेक मोठ्या कंपन्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

महिंद्रा इवेरिटो - या इलेक्ट्रिक कारची किंमत 9 लाख 50 हजार रुपये आहे. या कारवर 5 टक्के जीएसटी लागतो. या कारची माइलेज क्षमता 140 किमी आहे. जर या कारची बॅटरी संपली तरीही 8 किमीपर्यंत ही कार धावू शकते.