फूल टँकवर ९०० KM चे मायलेज; ₹५ लाखांच्या Tata Tiago वर ₹५५ हजारांचा डिस्काउंट...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:04 IST2025-08-11T12:17:45+5:302025-08-11T13:04:12+5:30

Tata Tiago on Discount:टाटाची Tiago तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकते.

काही लोक दररोज ऑफिसला जाण्यासाठी कार खरेदी करतात, तर काही लोक फक्त टूरसाठी कार घेणे पसंत करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे कार चालवणे स्वस्त राहिले नाही.

त्यामुळेच अनेकांना अशी कार हवी आहे, जी परवडणाऱ्या किमतीत चांगले मायलेज देईल आणि फीचर्समध्येही उत्तम असेल. अशा परिस्थितीत, टाटाची Tiago तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

गाडी वाडी या मीडिया वेबसाइटच्या वृत्तानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये टाटा टियागो खरेदीवर तुम्ही ५५ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे. या सूटमध्ये १० हजार रुपयांची रोख सूट आणि १५ हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस सामील आहे. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. टाटा टियागोची एक्स-शोरूम किंमत ५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप-एंड व्हेरिएंटसाठी ८.५५ लाख रुपयांपर्यंत जाते.

टाटा टियागो ११९९ सीसी १.२-लिटर रेवोट्रॉन पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन ६,००० आरपीएमवर ८६ पीएस पॉवर आणि ३,३०० आरपीएमवर ११३ एनएम टॉर्क देते. टाटा टियागो सीएनजी देखील बाजारात उपलब्ध आहे. टियागो सीएनजीमधील इंजिन ६,००० आरपीएमवर ७५.५ पीएस पॉवर आणि ३,५०० आरपीएमवर ९६.५ एनएम टॉर्क देते.

टाटा टियागो कार २४२ लिटरच्या बूट-स्पेससह येते. कारचा ग्राउंड क्लीयरन्स १७० मिमी आहे. या टाटा कारच्या समोर डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस ड्रम ब्रेक आहेत. त्याचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट २०.०९ किमी प्रति लिटर मायलेज देतो. तर, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली ही टाटा कार १९ किमी प्रति लिटर मायलेज देते.

टाटा टियागो कार सीएनजी मोडमध्ये चांगले मायलेज देते. टियागो सीएनजी मॅन्युअल ट्रान्समिशनसह २६.४९ किमी/किलो आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह २८.०६ किमी/किलो मायलेज देते. टाटा टियागोमध्ये ३५-लिटर पेट्रोल टँक आणि ६०-लिटर सीएनजी टँक आहे, जे पूर्ण भरल्यावर ९०० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.