शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शानदार फीचर्ससह आली नवीन Electric Bike, सिंगल चार्जमध्ये धावेल 125 किलोमीटर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 8:57 PM

1 / 8
Matter Aera ही स्ट्रीट फायटर इलेक्ट्रिक बाइक असून तिचे डिझाइन कॉम्पॅक्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये एलईडी लाइटिंग सिस्टीम, ऑटो-कॅन्सलिंग इंडिकेटर, स्प्लिट सीट्स, स्प्लिट ग्रॅब रेल, क्लिप-ऑन हँडलबार यांचा समावेश आहे.
2 / 8
ग्रे आणि निऑन, ब्लू आणि गोल्ड, ब्लॅक अँड गोल्ड आणि रेड आणि ब्लॅक अँड व्हाइट या चार ड्युअल टोन कलरमध्ये ही बाईक आणली जाईल. Matter Aera 5000 ला ऑप्शन म्हणून ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाचा टच डिस्प्ले मिळतो. याशिवाय, यामध्ये पार्क असिस्ट, कीलेस ऑपरेशन्स, ओटीए अपडेट्स यांसारख्या फीचर्सचा समावेश आहे.
3 / 8
दुसरीकडे, टॉप-मॉडेल 5000+ व्हेरिएंटवर ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड फॉर्ममध्ये मिळती आहे. या व्हेरिएंटसह लाइफस्टाइल आणि केअर पॅकेज देखील मिळत आहे. इलेक्ट्रिक बॅक लिक्विड-कूल्ड, 5kWh बॅटरी पॅकसह येते.
4 / 8
कंपनीचा दावा आहे की, बाईक एका चार्जवर 125 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकते. याची लिक्विड-कूल्ड मोटर 10.5kW वर रेट केलेली आहे. याचे वजन 180 किलोग्रॅम आहे आणि त्याच्या बॅटरी पॅकचे वजन सुमारे 40 किलो आहे.
5 / 8
बाईकमध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहे. ही बाईक ड्युअल-चॅनल एबीएस (अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम) ने सुसज्ज आहे. Matter Aera बाईक मुंबई, दिल्ली, पुणे, अहमदाबाद, कोलकाता आणि अधिक सारख्या मेट्रो आणि टियर 1 शहरांमध्ये बुकिंगसाठी उपलब्ध आहेत.
6 / 8
कंपनी बॅटरी पॅक आणि ई-बाईकवर 3 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. Matter Energy पुढील 45 दिवसांत अहमदाबादमध्ये पहिले एक्सपीरियंस सेंटर उघडणार आहे. याशिवाय, कंपनी पुढील 3 वर्षांत देशभरात 20 डीलरशिप उघडण्याचे लक्ष्य ठेवत आहे.
7 / 8
तसेच, या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी बाईकची डीलरशिप 100 पर्यंत वाढेल. Matter Aera इलेक्ट्रिक बाईक Aera 5000 आणि Aera 5000 या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत अनुक्रमे 1.44 लाख आणि 1.54 लाख रुपये आहे.
8 / 8
ही किंमत एक्स-शोरूमनुसार आहे. तसेच, FAME-II सबसिडी अंतर्गत इलेक्ट्रिक बाईक खरेदी केल्या जाऊ शकतात. चार्जरची किंमत बाईकच्या किमतीत समावेश आहे की नाही हे कंपनीने उघड केलेले नाही.
टॅग्स :motercycleमोटारसायकलbikeबाईकelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन