मारुतीची बहुप्रतिक्षित e-Vitara लॉन्च; किंमत फक्त ₹१०.९९ लाख, पाहा फीचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:38 IST2026-02-17T16:10:29+5:302026-02-17T16:38:07+5:30

Maruti e Vitara Price: सिंगल चार्जमध्ये तब्बल ५४३ किती रेंज.

Maruti e Vitara Price & Features: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki साठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. कंपनीने आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कार Maruti e-Vitara च्या किमतींचा खुलासा केला असून, यासह मारुतीने इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये औपचारिक प्रवेश केला आहे. कंपनीने नवीन e-Vitara दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकमध्ये सादर केली असून, सिंगल चार्जमध्ये ही तब्बल ५४३ किलोमीटरपर्यंतची रेंज देण्याचा दावा कंपनीने केला आहे.

किती आहे e-Vitaraची किंमत? Maruti ने आपली नवीन e-Vitara Battery as a Service (BaaS) रेंटल सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये सादर केली आहे. बॅटरीशिवाय कारची सुरुवातीची किंमत फक्त ₹१०.९९ लाख (एक्स-शोरूम) असून, बॅटरीसाठीचे भाडे ₹३.९९ प्रति किमी आहे. हे मॉडेल ग्राहकांसाठी इलेक्ट्रिक कारची किंमत कमी करण्यासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.

कशी आहे डिझाइन ? मारुती e-Vitara ला क्लीन, मॉडर्न आणि SUV लुक देण्यात आला आहे. याची लांबी ४,२७५ मिमी, रुंदी १,८०० मिमी, उंची १,६४० मिमी, तर व्हीलबेस २,७०० मिमी आहे. यामुळे e-Vitara कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये दमदार उपस्थिती निर्माण करते आणि केबिनमध्येही भरपूर स्पेस मिळतो.

प्रीमियम केबिन आणि आधुनिक टेक्नॉलॉजी- e-Vitara ही आतापर्यंतची सर्वात प्रीमियम मारुती कार मानली जात आहे. यात तुम्हाला १०.२५-इंच फुली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, १०.१-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फ्लोटिंग सेंटर कन्सोल, सॉफ्ट-टच मटेरियल, ड्युअल-टोन इंटीरियर, मल्टी-कलर अॅम्बियंट लाइटिंग मिळते.

याशिवाय वेंटिलेटेड फ्रंट सीट्स, १०-वे पॉवर अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ४०:२०:४० स्प्लिट रियर सीट्स (स्लाइड, रिक्लाइन आणि फोल्ड सुविधा), फिक्स्ड ग्लास सनरूफ आणि हार्मन-ट्यून साउंड सिस्टीम...या फीचर्समुळे कारचा प्रीमियम दर्जा अधिक ठळकपणे जाणवतो.

बॅटरी, मोटर आणि रेंज- Maruti e-Vitara मध्ये ३-इन-१ इलेक्ट्रिक ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामध्ये मोटर, इन्व्हर्टर आणि ट्रान्समिशन एकाच युनिटमध्ये समाविष्ट आहेत. यामुळे वजन कमी होऊन परफॉर्मन्स आणि रेंज सुधारते. यात तुम्हाला 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. याचे दोन्ही व्हेरिएंट्स फ्रंट-व्हील ड्राइव्ह (FWD) सेटअपसह येतात. जागतिक बाजारात e-Vitara चा ऑल-व्हील-ड्राइव्ह (AWD) पर्याय उपलब्ध असला तरी, तो भारतात येणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सेफ्टीच्या बाबतीत e-Vitara विशेष लक्ष देऊन विकसित करण्यात आली आहे. बॉडी स्ट्रक्चरमध्ये ५०% पेक्षा अधिक हाय-टेंसाइल स्टील, बॅटरीसाठी स्वतंत्र प्रोटेक्शन सिस्टीम, ७ एअरबॅग्स, ऑल-डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक...

टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), e-Call इमर्जन्सी फीचर, लेव्हल-2 ADAS, अ‍ॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग फीचर्सही देण्यात आले आहेत.