Maruti Suzuki CNG Car : CNG मध्ये येताच या कारच्या विक्रीनं घेतला रॉकेट स्पीड; 375% ची ग्रोथ, किंमत फक्त 6 लाख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 23:31 IST2022-10-09T23:26:37+5:302022-10-09T23:31:33+5:30
देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात मारुतीची ठोक विक्री दुपटीने वाढून 1,76,306 यूनिट्सवर पोहोचली आहे.

मारुती सुझुकीसह इतरही काही कंपन्यांनी सप्टेंबर महिन्यात पॉझिटिव ग्रोथ नोंदवली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात मारुतीची ठोक विक्री दुपटीने वाढून 1,76,306 यूनिट्सवर पोहोचली आहे. कंपनीने 104 टक्क्यांहून अधिकची ग्रोथ नोंदवली आहे.

सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या टॉप 10 कारमध्ये 6 कार एकट्या मारुती सुझुकीच्या आहेत. मारुती सुझुकी ऑल्टो ही देशातील आणि कंपनीची सर्वाधिक विकली गेलेली कार ठरली आहे. या कारच्या तब्बल 24,844 यूनिट्सची विक्री झाली आहे. याशिवाय कंपनीच्या ब्रेजानेही 724 टक्क्यांची ग्रोथ नोंदवली आहे.

याशिवाय कंपनीच्या आणखी एका गाडीच्या विक्रीत अचानक तेजी दिसून आली आहे. विशेष म्हणजे, या कारला फेसलिफ्ट अपडेटही मिळाले नाही, हिच्यात केवळ सीएनजीचे ऑप्शनच जोडण्यात आले आहे.

रॉकेट स्पीडनं झाली 'या' कारची विक्री - ज्या कार संदर्भात आम्ही बोलत आहोत, त्या कारचे नाव आहे मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift). गेल्या महिन्यात या कारचे 11,988 यूनिट्स विकले गेले आहेत. सप्टेंबर 2022 च्या टॉप 10 वाहनांमध्ये ही कार 9व्या क्रमांकावर होती.

गेल्या वर्षात सप्टेंबर महिन्यामध्ये स्विफ्टच्या केवळ 3,109 यूनिट्सचीच विक्री होऊ शकली. अशा प्रकारे स्विफ्टने 375 टक्क्यांची ग्रोथ नोंदवली आहे. या कारमध्ये आता सीएनजी ऑप्शन जोडण्यात आल्याने अचानक विक्री वाढली असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.

किंमत आणि फीचर्स - मारुती स्विफ्टची किंमत 5.92 लाख रुपये ते 8.85 लाख रुपयां दरम्यान आहे. (एक्स-शोरूम). या कारमध्ये 1.2-लिटर डुअल जेट पेट्रोल इंजिन (90PS आणि 113Nm) मिळते. गाडीत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 5-स्पीड AMT गिअरबॉक्सचे ऑप्शन आहे. या कारसोबत सीएनजी किटची सुविधाही दिली जाते. सीएनजीवर ही कार 30KM हून अधिक मायलेज ऑफर करते.

















