'या' 5 हॅचबॅक कारची होतेय सर्वाधिक विक्री, चौथ्या कारची किंमत फक्त 3.25 लाख, मायलेजही दमदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 08:13 PM2022-03-19T20:13:06+5:302022-03-19T20:19:05+5:30

हॅचबॅक कार सर्वच बाबतीत सर्वोत्तम असते. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीकडे सर्वाधिक मॉडेल्स आहेत...

हॅचबॅक वाहनांची मागणी नेहमीच अधिक असते. मग कार पहिल्यांदाच विकत घेणारे असोत अथवा कमी बजेटची समस्या असो, हॅचबॅक कार सर्वच बाबतीत सर्वोत्तम असते. या सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीकडे सर्वाधिक मॉडेल्स आहेत. गेल्या महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या 5 हॅचबॅक कार या याच कंपनीच्या आहेत.

1. Maruti Suzuki Swift मारुती सुझुकी स्विफ्ट फेब्रुवारी 2022 मध्ये वॅगनआरला मागे टाकत देशातील सर्वाधिक विकली गेलेली हॅचबॅक ठरली. स्विफ्टच्या 19,202 युनिट्सची विक्री झाली असून 5 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. फेब्रुवारी 2021 मध्ये हिचे 20,264 युनिट्स विकले गेले होते.

2. Maruti Suzuki Wagon R या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती मारुती सुझुकी वॅगनआर. फेब्रुवारी 2022 मध्ये वॅगनआरच्या 14,669 युनिट्सची विक्री झाली. यातही 22 टक्के घसरण बघायला मिळाली. फेब्रुवारी 2021 मध्ये हिच्या 18,728 युनिट्सची विक्री झाली होती.

कंपनीने नुकतेच वॅगनआरचे एक्सटेरिअर आणि इंटीरिअर अपडेट करून ती सादर केली आहे. या नव्या मॉडेलमुळे या महिन्यात वॅगनआरच्या बिक्रीत तेजी येण्याची शक्यता आहे.

3. Maruti Suzuki Baleno - मारुती सुझुकी बलेनो ही फेब्रुवारी 2022 मध्ये देशातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री झालेली हॅचबॅक ठरली आहे. बलेनोच्या 12,570 युनिट्सची विक्री झाली असून 37 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. फेब्रुवारी 2021 मध्ये हिच्या 20,070 युनिट्सची बिक्री झाली होती. कंपनीने नुकतेच 2022 बलेनोला नव्या फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर्ससह लाँच केले आहे.

4. Maruti Suzuki Alto या यादीत चौथ्या क्रमांकावर सर्वात स्वस्त असलेली मारुती सुजुकी ऑल्टो आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये ऑल्टोची 11,551 युनिट्स विकले गेले. यातही 32 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. फेब्रुवारी 2021 मध्ये हिचे 16,919 युनिट्स विकले गेले होते. कंपनीची ही कार पेट्रोलसह CNG ऑप्शनमध्येही उपलब्ध आहे. सीएनजीमध्ये ही कार 31KM हून अधिक मायलेज देते. हीची किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते.

5. Maruti Suzuki Celerio या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे मारुतीची सेलेरियो. ही कारही नुकतीच CNG ऑप्शनमध्ये आणण्यात आली आहे. के साथ लाया गया है। फरवरी 2022 में सेलेरियो की 9,896 यूनिट्स की बिक्री हुई है, जो फरवरी 2021 के मुकाबले 59 फीसदी ज्यादा है। बीते साल फरवरी महीने में इसकी 6,214 यूनिट्स बिकी थीं।