आता आणखी सुरक्षित झाली मारुती Fronx; बेस व्हेरिएंटमध्येही मिळतील ६ एअरबॅग्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 12:32 IST2025-07-28T12:26:37+5:302025-07-28T12:32:08+5:30

Maruti Fronx Safety: Maruti ने २०२३ मध्ये Fronx लॉन्च केली होती.

मारुती सुझुकी इंडिया त्यांच्या सर्व कारमध्ये ६ एअरबॅग्ज देत आहे. गेल्या काही महिन्यांत कंपनीने अल्टो के१० आणि सेलेरियोसारख्या सर्वात स्वस्त कारमध्येही ६ एअरबॅग्ज देणे सुरू केले आहे. आता मारुतीच्या त्यांची लोकप्रिय कार Fronx मध्येही ६ एअरबॅग्ज देत आहे. या अपडेटनंतर कंपनीने या कारची एक्स-शोरुम किंमत ०.५ टक्क्यांनी वाढवली आहे.

मारुतीने २०२३ मध्ये आपली कॉम्पॅक्ट एसयूव्ही फ्रॉन्क्स लॉन्च केली होती. ही कार अनेक प्रीमियम सुरक्षा वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. आता यात ६ एअरबॅग्जदेखील मिळणार आहेत. याशिवाय, कारमध्ये ३६० डिग्री सराउंड व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ESP), हिल होल्ड असिस्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि AECS (अ‍ॅडव्हान्स्ड इमर्जन्सी कॉल सिस्टम) सारखे आधुनिक फिचर्सदेखील मिळतात.

ही एसयूव्ही सुझुकीच्या टोटल इफेक्टिव्ह कंट्रोल टेक्नॉलॉजी (TECT) प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. या कारची बॉडी उच्च शक्तीच्या स्टीलपासून बनलेली आहे. जपानी व्हर्जनमध्ये लेव्हल-२ ADAS आणि AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) सारखे अतिरिक्त फिचर मिळतात.

फ्रँक्स पेट्रोल आणि CNG पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. यात दोन इंजिन पर्याय आहेत - पहिले, १.० लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, जे ९९ bhp पॉवर आणि १४७.६ Nm टॉर्क निर्माण करते; दुसरे, १.२ लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, जे ८९ bhp पॉवर आणि ११३ Nm टॉर्क निर्माण करते.

CNG मोडमध्ये ही पॉवर ७६ bhp आणि ९८.५ Nm पर्यंत पॉवर देते. यात ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि ५-स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. CNG मोडमध्ये कारचे मायलेज २८.५१ किमी/किलो आहे, ज्यामुळे ती त्याच्या सेगमेंटमधील सर्वात किफायतशीर SUV बनते.