Mahindra Scorpio नव्या नावाने लॉंच होणार! नवीन डिझाइनसह मिळणार आणखी दमदार फिचर्स; पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:47 PM2022-01-25T13:47:51+5:302022-01-25T13:52:29+5:30

नवीन Mahindra Scorpio 2022 नेस्ट जनरेशनबद्दल बरीच माहिती समोर आली आहे.

भारतात काही कार अशा आहेत, ज्यांनी काळ गाजवला. अशा अनेक कारची नावं घेता येतील, ज्यांनी त्या त्या कालावधीत भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आजही काही कारची नावं घेतली की, लोकं इमोशनल होतात, असं सांगितलं जातं.

या यादीत महिंद्रा स्कॉर्पियो (Mahindra Scorpio) भारतातील सर्वात पॉप्यूलर एसयूव्ही कारपैकी एक आहे. याच्या न्यू जनरेशन मॉडलची ग्राहकांना खूप उत्सूकता आहे. कंपनी खूप आधीपासून याची टेस्टिंग करीत आहे. अनेकदा याला स्पॉट केले गेले आहे.

Mahindra आपल्या Scorpio मध्ये आधीच्या तुलनेत दमदार डिझाइन, मॉर्डन इंटिरियर आणि पॉवरफुल पेट्रोल आणि डिझेल इंजिनचे ऑप्शन मिळणार आहे. कंपनी या कारचे नवीन मॉडलला नव्या नावाने बाजारात उतरवू शकते.

एका रिपोर्टच्या माहितीनुसार, नवीन स्कॉर्पियोचे मॉडल लाइनअप एक नवीन नावाने ‘Mahindra Scorpio Sting’ किंवा ‘Mahindra ScorpioN’ सोबत मार्केटमध्ये एन्ट्री करू शकते. या ठिकाणी ‘Mahindra ScorpioN’ नावाचे पॉवरफुल व्हेरियंट्स दिले जाऊ शकते. यासंबंधी कंपनीकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.

महिंद्राने नवीन स्कॉर्पिओसह विद्यमान मॉडेलची विक्री सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ नवीन स्कॉर्पिओ सध्याच्या मॉडेलची जागा घेणार नाही. २०२२ महिंद्रा स्कॉर्पिओला मिळणार्‍या इतर फिचरपैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे अलीकडेच लाँच झालेल्या Mahindra XUV700 मध्ये पाहिल्याप्रमाणे प्रगत ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली असू शकते.

कारच्या टॉप मॉडेलमध्येही हे फिचर असण्याची शक्यता आहे. येथे ग्राहकांना १० स्पीकर ऑडिओ सिस्टीम, ९ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, सर्वत्र एलईडी लाईट्स, ६ एअरबॅग्ज आणि कनेक्टेड कार तंत्रज्ञान यांसारखी हाय-टेक फीचर्स देखील मिळू शकतात.

Mahindra आपल्या नवीन Scorpio मध्ये ३६० डिग्री कॅमेरा देखील देणार आहे, ज्यामुळे नवीन स्कॉर्पिओ सुरक्षिततेच्या दृष्टीने एक उत्तम SUV बनणार आहे. यात २.० लीटर ४ सिलिंडर पेट्रोल इंजिन पाहायला मिळू शकते.

अपकमिंग २०२२ Mahindra Scorpio ला ६ स्पीड मॅन्यूअल आणि ६ स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्स सोबत येईल. नवीन महिंद्रा स्कॉर्पियोला रियर व्हील ड्राइव्ह सोबत ऑल व्हील ड्राइव्ह ऑप्शन मध्ये आणले जाण्याची शक्यता आहे.

नवीन Mahindra Scorpio बद्दल बरीच माहिती समोर आली आहे. नवीन स्कॉर्पिओ दिसायला खूपच मजबूत आहे, शार्क फिन अँटेना, मागील दरवाजाला स्पॉयलर, मल्टी स्पोक अलॉय व्हील देण्यात आले आहेत. चाचणी दरम्यान दिसलेली SUV पूर्णपणे स्टिकर्सने झाकलेली होती, त्यामुळे काही उर्वरित तपशील उघड झाले नाहीत.

नवीन Mahindra Scorpio च्या पुढील आणि मागील बाजूस मजबूत बंपर देण्याबरोबरच, कंपनीने एलईडी टेललॅम्प दिले आहेत. एसयूव्हीमध्ये बहु-कार्यात्मक स्टीयरिंग व्हील, स्वयंचलित हवामान नियंत्रण, पॅनोरॅमिक सनरूफ आणि वायरलेस चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये मिळू शकतात.