फुल चार्जिंगमध्ये 1000 किलोमीटरची रेंज देते ही धाकड EV; प्रायव्हेट जेटसारखी आहे केबीन! PHOTO बघून प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 13:31 IST2025-01-29T13:12:58+5:302025-01-29T13:31:43+5:30

या कारने ऑटोमोबाईल जगतात खळबळ उडवून दिली आहे...!

भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये सादर झालेल्या Lexus lf-zc ची सध्या जबरदस्त चर्चा सुरू आहे. लोक या कारची प्रचंड 'तारीफ' करत आहेत. महत्वाचे म्हणजे, हीच्या रेंजसंदर्भात जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

लेक्ससने नुकतेच एक नवी इलेक्ट्रिक कार LF-ZC चे अनावरण केले. या कारने ऑटोमोबाईल जगतात खळबळ उडवून दिली आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची रेंज. ही कार एकदा चार्ज केल्यावर १००० किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. कोणत्याही इलेक्ट्रिक कारसाठी हा एक नवा विक्रम आहे.

महत्वाचे म्हणजे, LF-ZC चे इंटेरियर डिझाइन अत्यंत आधुनिक आणि लक्झरीअस आहे. या कारमध्ये बसल्यानंतर आपल्याला एखाद्या प्रायव्हेट जेटची अनुभुती येईल. या कारमध्ये आपल्याला लक्झरी कारच्या सर्व सुविधा मिळतील.

नवीन तंत्रज्ञानाची बॅटरी - या कारमध्ये एका नव्या प्रकारच्या बॅटरी टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे हिची रेंज वाढली आहे. LF-ZC अत्यंत शक्तीशाली कार आहे. तसेच ही फार कमी वेळात ताशी 100 किलोमीटर एवढा वेग गाठते.

या कारमध्ये विविध प्रकारचे आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. जसे की, ऑटोमॅटिक पार्किंग, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टिम आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी. LF-ZC इलेक्ट्रिक कारमध्ये भविष्याची झलक दिसते.

इलेक्ट्रिक कार आता केवळ पर्यावरणासाठीच नाही, तर परफॉर्मेंस आणि लक्झरीसाठीही एक चांगला पर्याय होऊ शकते. असेही ही कार सिद्ध करते.