गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जर चुका केल्यात सतर जप्त होईल Driving Licence

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 12:39 PM2022-03-19T12:39:47+5:302022-03-19T12:59:51+5:30

मोटार वाहनांशी (Motor Vehicle) संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे या नियमांची माहिती घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.

मोटार वाहनांशी (Motor Vehicle) संबंधित नियम वेळोवेळी बदलत राहतात, त्यामुळे या नियमांची माहिती घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. नवीन नियमांचे पालन न केल्यास तुमचा लायसन्स जप्त केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही नियमांबद्दल सांगत आहोत, ज्याचं पालन केलं नाही तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.

जेव्हा तुम्ही गाडी चालवत असता तेव्हा लक्षात ठेवा की गाडीत म्युझीक जास्त जोरात नसावं. मोठ्या आवाजात म्युझीक वाजवताना पकडले गेल्यास १०० रुपयांचे चलान कापले जाते. त्याचवेळी हे मोठ्या आवाजात लावण्यात आलेलं म्युझीक रस्त्यावरून चालणाऱ्या इतर लोकांसाठी धोक्याचं असल्याचं वाहतूक पोलिसांना वाटलं तर याशिवाय चालकाचा लायसन्सही जप्त केलं जाऊ शकतं.

देशात प्रेशर हॉर्नच्या वापरावर बंदी आहे. एवढंच नाही तर प्रेशर हॉर्न लावणं हे देखील तुमच्या वाहनामध्ये बेकायदेशीररित्या केलेला फेरफार ठरतो. कोणत्याही वाहनामध्ये स्वतःच्या पद्धतीने बदल करण्याची परवानगी नाही. असे केल्यास लायसन्स जप्त करण्याबरोबरच मोठा दंडही आकारला जातो.

गाडी चालवताना फोन वापरल्यास दंड होऊ शकतो. कायद्यानुसार ड्रायव्हरला नेव्हिगेशन सेवेशिवाय इतर कोणत्याही कारणासाठी मोबाईल वापरता येत नाही.

चालणाऱ्या लोकांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंग तयार केलं जातं. परंतु अनेकदा सिग्नल लाल असताना लोक झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी नेतात. असं केल्यास तुमच्याकडून दंड आकारला जाऊ शकतो. इतकंच नाही तर काही महिन्यांसाठी तुमचा लायसन्सही सस्पेंड केला जाऊ शकतो.

अॅम्ब्युलन्सला रस्ता न देणंही तुमच्यासाठी भारी पडू शकतं. अॅम्ब्युलन्सला रस्ता न दिल्यास तुमचं चलान कापलं जाऊ शकतं किंवा ड्रायव्हिंग लायसन्सही जप्त केलं जाऊ शकतं.

टू व्हिलर चालवणारे अनेकदा ट्रॅफिकपासून वाचण्यासाठी फुटपाथवरुन गाडी नेतात. ट्रॅफिक नियमानुसार हा गुन्हा आहे. असं केल्यास तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स जप्त केलं जाऊ शकतं.