शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Kia ची EV सेगमेंटमध्ये एन्ट्री! Seltos Electric येतेय; एका चार्जिंगमध्ये ४०० किमीची रेंज, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 8:53 PM

1 / 9
भारतीय बाजारात प्रवेश केल्यापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आणि दमदार कामगिरी करत असलेली दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल कंपनी Kia Motors आता इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एन्ट्री घेत आहे.
2 / 9
आताच्या घडीला भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर सार्वकालिक उच्चांकावर असून, अधिकाधिक ग्राहक इलेक्ट्रिक वाहन क्षेत्राकडे वळत आहेत. या सेगमेंटमध्ये सध्या TATA चा दबदबा असून, अनेक कंपन्या आपल्या कार इलेक्ट्रिक स्वरुपात सादर केली आहे.
3 / 9
Kia Seltos भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV कारमध्ये वरच्या स्थानी असून, गेल्या महिन्यामध्ये तर ही कार सर्वाधिक विकली जाणारी (बेस्ट सेलिंग) मिड-साइज एसयूव्ही ठरली आहे. यातच आता याच कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन येणार असल्याचे सांगितले जात आहे.
4 / 9
रिपोर्टनुसार, कंपनी लवकरच Seltos ला इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये (Kia Seltos Electric) बाजारात आणणार आहे. कंपनी या कारचे इलेक्ट्रिक मॉडल जगातील अनेक देशांमध्ये लाँच करणार आहे. या कारचे पेट्रोल मॉडेल लोकांच्या पसंतीस उतरल्यामुळे कंपनीसाठी ही चांगली बाब ठरू शकते.
5 / 9
नवीन Kia Seltos इलेक्ट्रिकच्या फ्रंट टायगर नोज ग्रिलवर ब्लू हायलाइट्स मिळतील. ज्यामुळे ईव्ही असल्याचे वेगळेपण दिसते. याशिवाय, विंडोज लाइन, व्हील हब, रुफ आणि साइड प्रोफाईलवरही ग्रिलवर ब्लू हायलाइट्स मिळतील.
6 / 9
ही स्टँडर्ड आणि लाँग रेंज बॅटरी पर्यायांसह येण्याची शक्यता आहे. सेल्टॉस इलेक्ट्रिक 64kWh बॅटरी पॅक आणि 204bhp इलेक्ट्रिक मोटरसह उपलब्ध केले जाऊ शकते. ही ईव्ही एका चार्जवर सुमारे 400km ची रेंज देते. तर, स्टँडर्ड व्हर्जनमध्ये 312km ची रेंज देते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
7 / 9
कंपनी सुरूवातीला या EV च्या जवळपास १० हजार युनिट्स तयार करेल, असे सांगितले जात आहे. भारतातील लाँचिंगबाबत अद्याप कंपनीकडून माहिती मिळालेली नाही.
8 / 9
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात Kia Seltos ने विक्रीमध्ये Hyundai Creta, Skoda Kushak, Volkswagen Tigun आणि Maruti Suzuki S-Cross यांना धोबीपछाड देत १० हजार ४८८ युनिट विकले गेलेत.
9 / 9
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात Kia Seltos ने विक्रीमध्ये Hyundai Creta, Skoda Kushak, Volkswagen Tigun आणि Maruti Suzuki S-Cross यांना धोबीपछाड देत १० हजार ४८८ युनिट विकले गेलेत.
टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सelectric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कार