BOSE साऊंड सिस्टम, सनरुफसारख्या भन्नाट फीचर्ससह Kia Carens भारतात झाली लॉन्च; पाहा किंमत आणि डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 02:24 PM2022-02-15T14:24:46+5:302022-02-15T14:29:01+5:30

पाहा किती आहे Kia Carens ची किंमत आणि कोणते मिळतायत आणखी फीचर्स

किया मोटर्सची Kia Carens ही कार मंगळवारी भारतात लॉन्च करण्यात आली. Seltos, Carnival आणि Sonnet नंतर Kia ची ही भारतातील चौथी कार आहे. जवळपास एका महिन्यात कंपनीला आत्तापर्यंत 19000 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत.

केरेन्स या कारची निर्मिती अनंतपूर येथील फॅक्टरीमध्ये करण्यात येत आहे. ही कार भारतातच तयार करून परदेशात निर्यात करण्याची कंपनीची योजना आहे.

Kia Carens मध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत. यात 10.25-इंचाचा एचडी टचस्क्रीन डिस्प्ले, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, बोस साउंड सिस्टम, एअर प्युरिफायर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि सनरूफ देण्यात आले आहे.

यासोबतच सुरक्षेच्या दृष्टीने यात व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट, रिअर पार्किंग सेन्सर, डाउनहिल ब्रेकिंग कंट्रोल, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, ब्रेक असिस्ट यांचाही समावेश आहे. Kia नं ही कार सहा सीटर आणि सात सीटर या ऑप्शनमध्ये लाँच केली आहे.

Kia Carens पेट्रोल व्हर्जन 16.5 kmpl आणि डिझेल व्हर्जन 21.3 kmpl मायलेज देते. Kia Carens प्रीमियम, प्रेस्टीज, प्रेस्टीज प्लस, लक्झरी आणि लक्झरी प्लस या पाच ट्रिम व्हेरिअंटमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसंच यामध्ये सीटिंग ऑप्शन्सही उपलब्ध आहेत.

Kia Carens तीन इंजिन ऑप्शन्ससह येते. यामध्ये 1.5-लीटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर, 1.4-लीटर टर्बो पेट्रोल युनिट आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन यांचा समावेश आहे.

त्याचे 1.5-लिटर फोर-सिलेंडर पेट्रोल इंजिन 115hp पॉवर आणि 144Nm टॉर्क जनरेट करते, तर 1.4-लिटर फोर-सिलेंडर, टर्बो पेट्रोल इंजिन 140hp पॉवर आणि 242Nm टॉर्क जनरेट करते.

या शिवाय ही कार डिझेल इंजिन पर्यायासहदेखील येते. यामध्ये 1.5-लिटर फोर-सिलेंडर डिझेल इंजिन 115hp पॉवर आणि 250Nm पीक टॉर्क जनरेट करते.

Kia Carens 8.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे. त्याच वेळी या कारच्या टॉप-ऑफ-द-लाइन वेरिएंटची किंमत 16.99 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.