Jeep ने लॉन्च केली दमदार Wrangler; 85+ सेफ्टी फीचर्ससह ऑफरोडिंगचा थरार, पाहा किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 05:10 PM2024-04-25T17:10:41+5:302024-04-25T17:14:46+5:30

Jeep India Launched Wrangler: कंपनीने Wrangler Unlimited आणि Wrangler Rubicon, असे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत.

दिग्गज अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी Jeep ने भारतीय बाजारपेठेत एक नवीन सॉलिड ऑफरोडिंग SUV लॉन्च केली आहे. जीप इंडिया (Jeep India) ने मोस्ट अवेटेड Jeep Wrangler लॉन्च करून आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. कंपनीने या नवीन कारमध्ये 85+ सेफ्टी फीचर्स जोडले आहेत. कंपनीने या कारचे Wrangler Unlimited आणि Wrangler Rubicon, असे 2 व्हेरियंट लॉन्च केले आहेत. विशेष म्हणजे, ही कार आधीपासून परदेशी बाजारात उपलब्ध असून, याचे आतापर्यंत 50 लाख युनिट्स विकले गेले आहेत.

Jeep Wrangler ची पावरट्रेन-कंपनीने या कारमध्ये 2 लीटरचे टर्बोचार्ज्ड इनलाइन 4 सिलेंडर इंजिन दिले आहे. ही कार 270 हॉर्सपॉवर आणि 400 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. तसेच, या कारमध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि इंजिन स्टॉप-स्टार्ट फंक्शनदेखील आहे.

नवीन Wranglerची डिझाईन कशी आहे?-कंपनीने खासकरुन ही कार ऑफ-रोडिंगसाठी तयार केली आहे. कंपनीने कारचे डिझाइन रफ अँड टफ ठेवले आहे. या कारसाठी बॉडी ऑन फ्रेमचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय 5-लिंक सस्पेन्शन सिस्टीमदेखील देण्यात आली आहे. कारमध्ये 4 स्किड प्लेट्स, सेफगार्डिंग क्रिटिकल वेहिकल कंपोनेंट्ससह अनेक फीचर्स आहेत. कारमध्ये 17 इंची ॲल्युमिनियम व्हील्स मिळतील.

Wrangler मध्ये 85+ सुरक्षा फीचर्स-कंपनीने या कारमध्ये 85 हून अधिक अॅडव्हान्स सेफ्टी आणि सिक्योरिटी फीचर्स दिले आहेत. स्टँडर्ड फीचर्सबद्दल सांगायचे तर, फर्स्ट आणि सेकंड लाइनमध्ये साइट कर्टन एअरबॅग्स, पॅसेंजर फ्रंट एअरबॅग्स, ड्रायव्हर एअरबॅग्स आणि पॅसेंजर साइट एअरबॅग्स मिळतील. कारमध्ये ADAS सिस्टीम मिळेल, तसेच अॅडव्हान्स ब्रेक असिस्ट्ससोबत फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटो हाय बीम हेडलॅम्प्स, क्रूझ कंट्रोलसह अनेक सेफ्टी फीचर्स मिळतील.

Jeep Wrangler टेक्नोलॉजी फीचर्सने सुसज्ज-कारमध्ये 12.3 इंची डिजिटल टचस्क्रीन सिस्टीम मिळेल, जी Uconnect 5 शी जोडलेली असेल. यासोबतच, वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, फुल कस्टमाइज्ड होम स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. कारला 7 यूएसबी टाइप ए आणि टाइप सी पोर्ट मिळतील.

Jeep Wrangler ची किंमत-कंपनीने ही कार 2 व्हेरियंटमध्ये लॉन्च केली आहे. याच्या अनलिमिटेड व्हेरिएंटची किंमत 67.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि रुबिकॉन व्हेरिएंटची किंमत 71.65 लाख रुपये आहे. कंपनीने या कारचे बुकिंग सुरू केले असून, आतापर्यंत 100 युनिट्ससाठी बुकिंग मिळाली आहे. कारची डिलिव्हरी मे महिन्यात सुरू होईल.