Yezdi च्या दमदार Roadking साठी व्हा तयार; लवकरच लाँच होणार ही पॉवरफुल मोटरसायकल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 02:38 PM2021-07-05T14:38:11+5:302021-07-05T14:48:16+5:30

Yezdi Roadking : Mahindra च्या स्वामित्व असलेली कंपनी क्लासिक लेजेंड्सकडून भारतीय भाजारात स्थिती मजबूत करण्याची तयारी. Yezdi ची रोडकिंग बाईक पुन्हा होणार लाँच. ऐशी, नव्वदच्या दशकात या बाईकनं अनेकांना पाडली होती भुरळ.

महिंद्राच्या स्वामित्वाखालील कंपनी क्लासिक लेजेंड्स भारतीय बाजारात आपली स्थिती मजबूत करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं २०१८ मध्ये Jawa हा ब्रँड लाँच केला होता.

जावा या ब्रँड अंतर्गत कंपनीनं जावा, जावा ४२ आणि पेरॉक या बाईक्सची विक्री करण्यास सुरूवात केली होती. आता क्लासिक लेजेंड्स भारतीय बाजारात आपल्या जुन्या गाडीला पुन्हा लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनी लवकरच Yezdi ची नवी बाईक Roadking लाँच करणार आहे.

क्लासिक लेजेंड्स आयकॉनिक Yezdi सोबतच BSA मोटरसायकल्सदेखील पुनरुज्जीवित करण्याची तयारी करत आहे. कंपनी BSA अंतर्गत नवी मॉडेल्स युरोपियन बाजारात उतरवणार आहे.

कथितरिक्या क्लासिक लेजंड्स या वर्षाच्या अखेरपर्यंत Yezdi ची नवी बाईक लाँच करण्याची शक्यता आहे. या बाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर Yezdi रोडकिंग लाँच करण्याची शक्यता आहे.

नुकतंच क्लासिक लेजेंड्सनं Yezdi रोडकिंग या नावानं भारतात ट्रेडमार्कही फाईल केला आहे. तसंच ही बाईक एक स्क्रॅबलर बाईक असेल असं सांगण्यात येत आहे.

Yezdi रोडकिंग या बाईकनं यापूर्वी ऐशी आणि नव्वदच्या दशकांत अनेकांना भूरळ पाडली होती. म्हैसूरमधील आयडिल जावा लिमिडेटद्वारे या बाईकचं उत्पादन १९७८ आणि १९९६ दरम्यान करण्यात आलं होतं.

दरम्यान, नव्या Yezdi रोडकिंगमध्ये कंपनी २९३ सीसी क्षमतेच्या लिक्विड कुल्ड आणि सिंगल सिलिंडरचा वापर करू शकते. याचाच वापर जावा बाईक्समध्येही करण्यात आला होता. हे इंजिन २६.५१ बीएचपीची पॉवर आणि २७ एनएम टॉर्क जनरेट करतं. तसंच ते इंजिन ६ स्पीड गियरबॉक्स नुसार येतं.

नवी Yezdi रोडकिंग ही बाईक एका मॉडर्न स्क्रॅम्बलर प्रमाणे दिसेल. स्पाय फोटोंवरून या मोटरसायकलमध्ये नॅरो टेल एन्ड आणि स्लिम फ्लॅट रिब्ड सीट्स देण्यात आल्याचं दिसून येत आहे.

याशिवाय या बाईकमध्ये ट्विन एक्झॉस्ट, गोल हेडलँप आणि लांब हँडलबार देण्यात आले आहे. तसंच प्रोडक्शन रेडी मॉडेलमध्ये कंपनी LED लायटिंगचाही वापर करेल असं सांगण्यात येत आहे.