Flying Car : 'ही' कार दोन मिनिटांत बनते फ्लाइट, टॉप स्पीड 170 km/h; स्लोव्हाकियाने दिली उड्डाण करण्याची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:24 PM2022-01-27T12:24:34+5:302022-01-27T12:31:47+5:30

Flying Car : एअरकारला (AirCar) स्लोव्हाकियामध्ये फ्री सर्कुलेशनसाठी परवानगी मिळाली आहे.

जर तुम्ही स्लोव्हाकियाला (Slovakia) गेलात तर तुम्हाला लवकरच कार आकाशात उंच भरारी घेताना दिसेल. फ्लाइंग कारबाबत अनेक देशांमध्ये चाचणी सुरू आहे.

अनेक देशांना हे स्वप्न वाटत आहे, पण स्लोव्हाकियामध्ये ही कार हवेत उडण्यासाठी सज्ज झाली आहे. एअरकारला (AirCar) स्लोव्हाकियामध्ये फ्री सर्कुलेशनसाठी परवानगी मिळाली आहे.

कार-एअरक्राफ्ट कॉन्सेप्ट 170 km/h पर्यंतच्या टॉप स्पीड गाठू शकते. आता ही फ्युचरिस्टिक कार बनण्यास तयार आहे. हायब्रीड व्हीकल एअरकार दोन मिनिटांत कारमधून विमानात रुपांतर होते.

कारच्या दोन्ही बाजूला बसवलेले विंग्स, बीएमडब्ल्यू इंजिन आणि रिअर विंगमुळे फ्लाइंग कारला खऱ्या विमानाप्रमाणे टेकऑफ करू देतात. स्लोव्हाकियाच्या परिवहन प्राधिकरणाने Klein Vision ला एअरकार उडवण्याची परवानगी दिली आहे.

ही कार 2500 मीटर पर्यंत जाऊ शकते आणि तिचा टॉप स्पीड 170 किमी/तास आहे. ती पेट्रोलवर चालते. ज्यावेळी या कारचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होईल, त्यावेळी त्याची रेंज1000 किमी पर्यंत जाण्याची निर्मात्यांची अपेक्षा आहे.

कार उडवण्यासाठी पायलटचा परवाना असणे आवश्यक असणार आहे. एअरकारवर 70 मिनिटांची फ्लाइट टेस्टिंग आणि 200 हून अधिक टेकऑफ आणि लँडिंग टेस्ट करण्यात आल्या.

कंपनीने सांगितले की, एअरकारला प्रमाणपत्र मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकांना आता कार्यक्षम उडणारी कार मिळणार आहे. कंपनी लवकरच पॅरिस ते लंडन उड्डाणे करणार आहे.

इतर कंपन्या देखील फ्लाइंग आणि ड्रायव्हिंग कार विकसित करत आहेत. त्यात eVTOL कॉन्सेप्ट देखील समाविष्ट आहे. मात्र, ही कार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अजून बराच अवधी आहे.

फोटोस् क्रेडिट -Klein Vision