टाटा-मंहिद्रा विसरा; या दोन SUV's सेफ्टी फीचर्समध्ये नंबर-1, क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 04:09 PM2022-10-15T16:09:04+5:302022-10-15T16:13:22+5:30

या दोन्ही गाड्यांनी ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे.

Volkswagen Taigun आणि Skoda Kushaq भारताच्या रस्त्यांवर सर्वात सुरक्षित कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून समोर आली आहे. या दोन्ही गाड्यांनी ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळवली आहे.

यासोबतच Kushaq आणि Taigun, XUV700 आणि XUV300प्रमाणे सर्वात सुरक्षित कारच्या यादीत सामील झाली आहे. Skoda Auto Volkswagen India ची मेड-इन-इंडिया SUV आहे.

विशेष म्हणजे, Skoda आणि Taigun चे उत्पादन पुण्यातील प्लांटमध्ये केले जाते. या दोन गाड्यांशिवाय Tata Motors ची Nexon आणि Punch गाड्यांनीही Global NCAP मध्ये सर्वाधिक सेफ्टी रेटिंग्स मिळवली आहे.

Taigun आणि Kushaq भारताच्या पहिल्या दोन गाड्या आहेत, ज्यांची चाचणी ग्लोबल NCAP ने आपल्या नवीन क्रॅश टेस्ट प्रोटोकॉल अंतर्गत केली आहे. नवीन नियमांमध्ये फ्रंटल आणि साइड इफेक्ट प्रोटेक्शन असेसमेंट, ESC आणि पायी चालणाऱ्या व्यक्तीची सुरक्षा सामील आहे.

टेस्टिंग झालेल्या दोन्ही एसयूव्ही चाचणीत पास झाल्या. टेस्टिंग रिझल्टनुसार, Taigun आणि Kushaq, दोन्ही गाड्या स्टेबल होत्या. या दोन्ही गाड्या हाय सेफ्टी रेटिंग्समध्येही यशस्वी राहिल्या. याशिवाय, साइड इफेक्ट टेस्टिंगमध्येही गाड्यांनी चांगली क्षमता दाखवली.

एकूणच काय, तर Taigun आणि Kushaq ने एडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 34पैकी 30 अंक आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शनमध्ये 49पैकी 42 अंक मिळवले.

Volkswagen Taigun च्या सेफ्टी फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6 एअरबॅग, EBD सोबत ABS, ESC, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), मल्टी कोलिजन ब्रेकिंग, रिअर पार्किंग डिस्टेंस कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल आणि मिड पॅसेंजरसाठी 3-पॉइंट सीट बेल्टसारक्या सुविधा आहेत. तर, Kushaqमध्ये वरील सर्व फीचर्स मिळतात.