Ford India नं लाँच केली SUV EcoSport चं नवं व्हेरिअंट; मिनिटांमध्ये दुरूस्त करता येणार डॅमेज्ड टायर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 06:32 PM2021-03-10T18:32:33+5:302021-03-10T18:37:03+5:30

Ford India EcoSport SE : पाहा किती आहे किंमत आणि काय आहेत स्पेसिफिकेशन्स

Ford India नं बुधवारी आपली लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही EcoSport चं नवं व्हेरिअंट लाँच केलं आहे. या अंतर्गत ग्राहकांना दोन बॉडी स्टाईल्स निवडण्याचा पर्याय मिळेल.

ग्राहकांना स्पेअरल व्हिलवर रिअर मांऊंटेड सिग्नेचरचा पर्यायच मिळेल ती त्यांना यासोबत बॉडी स्टाईल हवी अथवा नको. EcoSport SE या नावानं उपलब्ध असलेली ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.

या कारच्या पेट्रोल व्हेरिअंटची किंमत 10.49 लाख रूपये आणि डिझेल व्हेरिअंटची किंमत 10.99 लाख रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. कंपनीनं याबाबतची माहिती दिली.

या नव्या व्हेरिअंटमध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे टायर स्लॉटमधून न हलवता काही मिनिटांतच डॅमेज दुरूस्त करता येईल.

फोर्ड इंडियानं दिलेल्या माहितीनुसार नव्या व्हेरिअंटचं डिझाईन हे अमेरिकन आणि युरोपियन पीयर्सपासून प्रेरित असलेलं आहे.

या व्हेरिअंटमध्ये नवं फीचर देण्यात आलं असून पंक्चर किटचा वापर करणं सोपं ठरणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

EcoSport SE मध्ये पॉवरसाठी 1.5 लीटर 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन लावण्यात आलं आहे. ते 122ps ची पॉवर जनरेट करतं.

तसंच डिझेल व्हेरिअंटमध्ये 1.5 लिटरचं असलेलं इंजिन हे 100PS पर्यंत पॉवर जनरेट करतं. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार दोन्ही इंजिन फोर्डच्या रिस्पॉन्सिव्ह आणि Aigle-5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सनं युक्त आहे.

यामध्ये सुरक्षेवर विशेष लक्ष देण्यात आलं असून यात SYNC3 सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. SYNC3 पूर्णपणे इंटिग्रेड, व्हॉईस अॅक्टिव्हेटेड कम्युनिकेशन्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टम टेक्नॉलॉजी आहे.

ग्राहकांना EcoSport SE विशेषरित्या पसंतीस येईल. ही कार ग्लोबल बेंचमार्कच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षेवरही लक्ष देण्यात आलं असल्याची माहिती फोर्ड इंडियाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (मार्केटिंग, सेल्स अँड सर्व्हिसेस) विनय रैना यांनी दिली.

Read in English