भारतात लॉन्च झाली Ducati ची सुपर अॅडव्हेंचर बाइक; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:39 IST2025-11-07T12:34:54+5:302025-11-07T12:39:23+5:30

याच्या फिचर्समुळे ही भारतातील सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर बाइक्सपैकी एक ठरते.

Ducati Bike: इटालियन सुपरबाइक निर्माता Ducati ने भारतात आपली सर्वात हाय-परफॉर्मन्स अॅडव्हेंचर बाइक Multistrada V4 Pikes Peak लॉन्च केली आहे. ही केवळ एक अॅडव्हेंचर मशीन नसून तंत्रज्ञान, वेग आणि लक्झरीचा एकत्रित अनुभव देणारी बाइक आहे. याीची किंमत ₹36.16 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. त्यामुळे ही भारतातील सर्वात प्रीमियम अॅडव्हेंचर बाइक्सपैकी एक ठरते.

दमदार V4 इंजिन आणि 168bhp पॉवर- Multistrada V4 Pikes Peak मध्ये 1,158cc V4 Granturismo इंजिन देण्यात आले आहे, जे 168bhp पॉवर आणि 123.8Nm टॉर्क निर्माण करते. हे इंजिन Euro 5+ compliant आणि E20 फ्युएल रेडी आहे, म्हणजेच भविष्यातील पर्यावरणपूरक इंधनांवरही चालेल. याचे ऑइल बदलण्याचे अंतर 15,000 किमी आणि व्हॉल्व्ह सर्व्हिस 60,000 किमी इतके आहे, म्हणजे मेंटेनन्सची काळजी कमी आणि रायडिंगचा आनंद जास्त.

रेसिंग DNA आणि नवीन Race Mode- डुकाटीने या बाइकमध्ये नवीन Race Riding Mode सामील केला आहे, ज्यामुळे रायडिंग अनुभव अधिक फास्ट आणि स्मूद बनतो. यात क्विकशिफ्टर, डायरेक्ट थ्रॉटल रिस्पॉन्स आणि हाय पॉवर सेटअप देण्यात आले आहे. रियर सिलिंडर डीअॅक्टिव्हेशन सिस्टम मुळे इंजिनचे तापमान कमी राहते आणि फ्युएल कार्यक्षमता वाढते.

स्मार्ट सस्पेन्शन आणि कम्फर्ट राइडिंग- या बाइकमध्ये Ohlins Smart EC 2.0 सस्पेन्शन सिस्टम दिले आहे, जे डुकाटीच्या सुपरबाइक्समधून थेट आणले गेले आहे. हे सिस्टम राइडिंग स्टाइल आणि रस्त्याच्या परिस्थितीनुसार आपोआप सस्पेन्शन ट्यून करते. तसेच, आरामशीर राइडमध्ये ते सॉफ्ट बनते, म्हणजेच परफॉर्मन्स आणि कम्फर्ट दोन्हींचा उत्तम समतोल.

रडार-बेस्ड टेक्नॉलॉजी आणि सेफ्टी फीचर्स- सेफ्टीच्या दृष्टीनेही ही बाइक तंत्रज्ञानाच्या पुढच्या पातळीवर आहे. यात रडार-बेस्ड सिस्टम देण्यात आले आहे, जे Adaptive Cruise Control (ACC), Blind Spot Detection (BSD) आणि Forward Collision Warning (FCW) सारख्या अॅडव्हान्स फीचर्सना सपोर्ट करते. हे फीचर्स खासकरून भारतीय ट्रॅफिक कंडिशन्स लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आले आहेत.

6.5-इंच TFT डिस्प्ले आणि 5 राइडिंग मोड्स- बाइकमध्ये 6.5-इंच TFT डिस्प्ले आहे, ज्यात क्लीन इंटरफेस आणि OTA अपडेट्सचे सपोर्ट मिळते. रायडरला पाच मोड्स Race, Sport, Touring, Urban आणि Wet निवडता येतात. डिझाइनच्या बाबतीत, ही बाइक पूर्णतः रेसिंग DNA वर आधारित आहे.

17-इंच फोर्ज्ड व्हील्स, Pirelli Diablo Rosso IV टायर्स, Brembo Stylema ब्रेक्स, कार्बन फायबर ट्रिम्स, Akrapovič टायटॅनियम सिलेंसर आणि स्पेशल रेस लिव्हरी ही वैशिष्ट्ये तिला आणखी प्रीमियम बनवतात. हँडलबार अधिक लो आणि अरुंद, तर फूटपेग्स हाय आणि मागे ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे अधिक लीन अँगल आणि रायडिंग कंट्रोल मिळतो.