CNG Pollution: पेट्रोल, डिझेलएवढाच CNG खतरनाक; दुष्परिणाम वाचून धक्का बसेल, संशोधनात उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 04:56 PM2021-07-19T16:56:43+5:302021-07-19T17:04:20+5:30

CNG is as dangerous as petrol and diesel: ग्रामीण भागात शेतामध्ये खतांच्या आणि रसायनांच्या वापरामुळे हवेत नायट्रोजन ऑक्साईड असतेच, परंतू शहरांमध्ये याची वाढ होण्याचे मुख्य कारण सीएनजी वाहनांमधून होणार उत्सर्जन हे आहे.

ग्रीन पीस इंडियाच्या एका अहवालाने जगाची झोप उडवून टाकली आहे. जे पर्यावरणाला पुरक असे इंधन म्हणत होतो ते सीएनजी (CNG) पेट्रोल, डिझेल (Petrol, diesel) एवढेच खतरनाक असल्याचे समोर आले आहे. दिल्लीसह देशातील मोठ्या शहरांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत नायट्रोजन ऑक्साईडमध्ये मोठी वाढ झाली आहे. (cng more dengerous than petrol, diesel vehicals to human and enviorment.)

सॅटेलाईट डेटाच्या विश्लेषणाच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. एप्रिल 2020 च्या तुलनेत एप्रिल 2021 मध्ये दिल्लीत नायट्रोजन ऑक्साईडची मात्रा 125 टक्क्यांनी वाढलेली दिसली.

ग्रामीण भागात शेतामध्ये खतांच्या आणि रसायनांच्या वापरामुळे हवेत नायट्रोजन ऑक्साईड असतेच, परंतू शहरांमध्ये याची वाढ होण्याचे मुख्य कारण सीएनजी वाहनांमधून होणार उत्सर्जन हे आहे.

नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे मिसळलेले रुप म्हणजे नायट्रोजन ऑक्साईड हे तेवढेच पर्यावरणासाठी धोकादायक आहे जेवढे कार्बनडाय ऑक्साईड. युरोपमध्ये झालेले संशोधन सांगते की, सीएनजी वाहनातून निघालेले नॅनो मीटर आकाराचे अतिसुक्ष्म कण हे कॅन्सर, अल्झायमर आणि फुफ्फुसाच्या आजारांसाठी खुले निमंत्रण देतात.

युरोपभर विविध प्रयोगशाळांमध्ये सीएनजीच्या वाहनांमधील वापरावर संशोधन सुरु आहे. युरो-६ मध्ये सीएनजी वाहनातून या कणांच्या उत्सर्जनाची मर्यादा ठरविलेली नाही. यामुळे या कणांमुळे पर्यावरण आणि मानवी जिवनावरील दुष्प्रभावांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

पर्यावरणाचा मित्र असे जरी सीएनजीला म्हटले जात असले तरीदेखील 2.5 एनएमपेक्षा कमी जाडीच्या कणांचे उत्सर्जन हे पेट्रोल, डिझेल वाहनांच्या तुलनेत 100 ते 5000 पटींनी जास्त आहे. वाहने जिथे हळू हळू चालतात अशा शहरी भागात हे जास्त आहे.

भारतासारख्या उष्णकटीबंध देशात सीएनजी वाहने तेवढेच धोकादायक उत्सर्जन करत आहेत, जेवढे डिझेल आणि बस नुकसान करत होती. सीएनजी वापरामुळे कार्बनच्या मोठ्या कणांमध्ये कमी आली आहे, एवढाच फरक झाला आहे. एवढेच नाही तर ही वाहने प्रति किमीला 20 ते 66 मिली ग्रॅम अमोनिया उत्सर्जन करतात, जो हरित वायू आहे आणि ओझोनवर थेट परिणाम करतो.

सीएनजीमुळे अन्य इंधनांच्या तुलनेत पार्टिक्युलेट मॅटर 80 टक्के आणि हायड्रो कार्बन 35 टक्क्यांनी कमी उत्सर्जित होते. मात्र, कार्बन मोनो ऑक्साईड पाच पटींनी वाढते. शहरांतील धुरके आणि वातावरणातील ओझोन लेअरसाठी हे खूप धोक्याचे आहे. हवेत ऑक्साईड आणि नायट्रोजन गॅसचे अधिक असणे याचा परिणाम श्वसन संस्थेवर पडतो. यामुळे फुफ्फुसांची क्षमता कमी होते.

ऑक्साईड आणि नाय़ट्रोजन गॅस वातावरणातील पाणी आणि ऑक्सिजनसोबत मिळून अॅसिडयुक्त पाऊस पाडू शकते. रेट्रोफिटेड सीएनजी कार 30 टक्के अधिक मिथेन उत्सर्जन करते, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाला 2011 मध्ये आढळले आहे.

पेट्रोल डिझेल सारखेच सीएनजी देखील जिवाश्म इंधन आहे. मात्र, पेट्रोल, डिझेलपेक्षा कमी हवा प्रदूषण होते, असा आजवरचा समज आहे. हाच सीएनजी आता मानवासाठी धोकादायक बनत चालला आहे.