'या' आहेत सर्वाधिक मायलेज देणाऱ्या सीएनजी कार, शानदार लुकसह अप्रतिम फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 01:00 PM2022-05-25T13:00:38+5:302022-05-25T13:06:43+5:30

Best Mileage and Most fuel efficient CNG Cars : जर तुम्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास सीएनजी कारबाबत माहिती देत आहोत. यामध्ये कमी किंमतीत जास्त मायलेजसह अनेक फीचर्स मिळतात.

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे लोकांचा कल आता सीएनजी गाड्या खरेदीकडे वाढताना दिसून येत आहे. हे पाहता ऑटोमाबाईल कंपन्या सुद्धा सतत नव-नवीन सीएनजी गाड्या बाजारात लाँच करत आहे. जर तुम्ही कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही काही खास सीएनजी कारबाबत माहिती देत आहोत. यामध्ये कमी किंमतीत जास्त मायलेजसह अनेक फीचर्स मिळतात.

मायलेजच्या बाबतीत मारुतीची सेलेरियो सीएनजी (Maruti Suzuki Celerio CNG) खूपच चांगली आहे आणि कंपनी 35.6 किमी प्रति किलो मायलेजचा दावा करते. मारुती सुझुकी सेलेरिओ सीएनजीची किंमत 6.69 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे. या कारमध्ये 998 cc इंजिन आहे, जे 57hp पॉवर आणि 82.1 Nm टॉर्क जनरेट करते.

मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये वॅगनआर पहिल्या क्रमांकावर आहे. याचे सीएनजी प्रकार (Maruti Suzuki WagonR CNG) देखील लोकांना खूप आवडते. कंपनीचा दावा आहे की, मारुती वॅगनआर सीएनजी 32.52 किमी/किलो मायलेज देते. वॅगनआर सीएनजी फक्त 1.0 लिटर इंजिन देण्यात आले आहे, जे 58 hp पॉवर आणि 78 Nm पीक टॉर्क जनरेट करते. कारची किंमत 6.42 लाख ते 6.86 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे.

मारुतीची सर्वात स्वस्त कार ऑल्टो 800 सीएनजी (Maruti Suzuki Alto 800 CNG) सुद्धा लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. या कारच्या मायलेजबाबत बोलायचे झाल्यास, कंपनी एक किलोमध्ये 31.59 किमी धावण्याचा दावा करते. कारची किंमत 5.03 लाख रुपये (दिल्ली एक्स-शोरूम) आहे. ऑल्टो 800 सीएनजीसाठी 796 सीसी इंजिन देण्यात आले आहे ,जे 40 hp आणि 60 Nm पर्यंत पीक टॉर्क जनरेट करते.

मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजी (Maruti Suzuki S-Presso CNG) वॅगनआर आणि ऑल्टोनंतर सर्वाधिक मायलेज देणार्‍या क्रमांकावर येते, जी 31.2 किमी/किलो मायलेज देते. मारुती सुझुकी एस-प्रेसो सीएनजीमध्ये 1.0-लिटर इंजिन आहे, जे 59 PS पॉवर आणि 78 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 5.38 लाख रुपये ते 5.64 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.

सीएनजी कारच्या शर्यतीत ह्युंदाई सॅन्ट्रो देखील सामील आहे. कंपनीचा दावा आहे की ह्युंदाई सॅन्ट्रो सीएनजी (Hyundai Santro CNG) 30.48 km/kg मायलेज देते. ह्युंदाई सॅन्ट्रो सीएनजी 1.1-लिटर इंजिनसह येते, जे 60 PS पॉवर आणि 85 Nm टॉर्क जनरेट करते. ह्युंदाई सॅन्ट्रो सीएनजी मॅग्नाची किंमत 6.10 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ह्युंदाई सॅन्ट्रो सीएनजी स्पोर्ट्सची किंमत 6.42 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.