कमी किमतीत फॅमिली कार घ्यायची आहे? 5 ते 7 लाखांच्या बजेटमध्ये 'या' आहेत सर्वोत्तम कार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:41 IST2025-11-22T17:35:57+5:302025-11-22T17:41:44+5:30

Best Family Car In Budget: कमी किमतीत मिळतात प्रीमियम फीचर्स, पाहा...

Best Family Car In Budget: फॅमिली कार खरेदी करताना प्रत्येकजण कमी बजेटमध्ये जास्त मायलेज, स्पेस आणि फीचर्स पाहतात. भारतीय बाजारात सध्या 5 ते 7 लाखांच्या बजेटमध्ये अनेक कार्स उपलब्ध आहेत, ज्या किफायतशीर असूनही परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि मॉडर्न फीचर्सने सुसज्ज आहेत.

Maruti Swift- या कारने अनेक वर्षांपासून मध्यमवर्गीयांच्या मनावर राज्य केले आहे. याची किंमत फक्त ₹5.79 लाखांपासून सुरू होते, तर ही कार 22-24 kmpl मायलेज देते. या कारच्या 2025 मॉडेलमध्ये 9-इंच स्मार्ट टचस्क्रीन, क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग्स, स्मूथ आणि रिस्पॉन्सिव्ह इंजिन मिळते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये सुरक्षित आणि मॉडर्न पर्याय आहे.

Renault Kwid- या कारची किंमत फक्त ₹4.92 लाखांपासून पासून सुरू होते. ही कार 20-22 kmpl चे मायलेज देते. यात फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 8-इंच टचस्क्रीन, रियर व्ह्यू कॅमेरासह स्टायलिश लुक मिळतो.

Hyundai Grand i10 NIOS- कम्फर्ट आणि प्रीमियम इंटीरियरचा उत्तम मेळ असलेल्या या कारची किंमत ₹5.47 लाखांपासून सुरू होते. ही कार तुम्हाला 18-21 kmpl मायलेज देईल. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात वायरलेस चार्जर, ऑटो AC, 8-इंच इंफोटेनमेंट सिस्टम, 6 एअरबॅग्स मिळतात. ज्या कुटुंबांना ड्रायव्हिंगसोबत आराम आणि प्रीमियम फील हवे असते त्यांच्यासाठी आदर्श पर्याय.

Honda Amaze- मोठा केबिन स्पेस हवा असेल, ही कार तर उत्तम पर्याय आहे. याची किंमत सुमारे ₹7 लाखांपासून सुरू होते. ही कार तुम्हाला 18-20 kmpl मायलेज देईल. यात तुम्हाला मोठा बूट स्पेस, स्मूथ राइड क्वालिटी, प्रीमियम ड्रायव्हिंग अनुभव मिळतो. लांब प्रवासासाठी अत्यंत आरामदायक कार आहे.

Tata Tiago- मजबूत बिल्ड क्वालिटी आणि सुरक्षेसाठी ओळखली जाणारी टियागो फक्त ₹4.99 लाखांपासून सुरू होते. ही कार तुम्हाला 19-23 kmpl मायलेज देईल. यामध्ये तुम्हाला 7-इंच टचस्क्रीन, डिजिटल कन्सोल, मजबूत बॉडी स्ट्रक्चर मिळते. कमी किंमत, उच्च सुरक्षा आणि मॉडर्न फीचर्समुळे ‘व्हॅल्यू फॉर मनी’ कार आहे.