Jimny Vs Thar: इंजिन छोटे असले तरी थारपेक्षा या पाच गोष्टींत सरस आहे जिम्नी, पहा ती फिचर्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 01:21 PM2023-01-23T13:21:34+5:302023-01-23T13:24:27+5:30

Jimny Vs Thar Comparison: जर तुम्हाला अशी एसयुव्ही खरेदी करायची असेल तर सध्या तरी दोनच पर्याय आहेत जे १० लाखांत उपलब्ध होऊ शकणार आहेत.

मारुतीने ऑटो एक्स्पोमध्ये ऑफ रोडिंग एसयुव्ही प्रदर्शित केली होती. महिंद्राच्या थारला टक्कर देणारी मारुती जिम्नी भारतीय रस्त्यांवर उतरविण्यात येणार आहे. जर तुम्हाला अशी एसयुव्ही खरेदी करायची असेल तर सध्या तरी दोनच पर्याय आहेत जे १० लाखांत उपलब्ध होऊ शकणार आहेत.

मारुती जिम्नीमध्ये असे पाच फिचर्स आहेत जे तुम्हाला थारपेक्षा पॉवर कमी असली तरी उजवे ठरणार आहेत. कोणते ते पाहुयात....

ऑफ-रोडिंग एसयूव्ही असली तरी, मारुती जिम्नी एक चांगली इन्फोटेनमेंट सिस्टम ऑफर करते. जिम्नीमध्ये कंपनीकडून नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात येत आहे. थारमध्ये कंपनी फक्त सात इंची इंफोटेनमेंट सिस्टम देते. दोन्ही एसयूव्ही अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्ले सारखी वैशिष्ट्ये देतात.

मारुतीच्या जिम्नीमध्ये कंपनी एलईडी हेडलॅम्प देतेय. यासोबतच यात हेडलाइट्ससाठी वॉशर देखील मिळतो. तर महिंद्राच्या थारमध्ये कंपनी फक्त हॅलोजन हेडलॅम्प मिळतात.

मारुती जिम्नीमध्ये सुरक्षेचीही काळजी घेण्यात आली आहे. यात कंपनीने सहा एअरबॅग दिल्या आहेत तर महिंद्राच्या थारमध्ये फक्त दोन एअरबॅग दिल्या जातात.

महिंद्राची थार तीन दरवाज्यांची आहे. तर जिम्नीला पाच दरवाजे आहेत. म्हणजेच मागच्या सीटवर जाण्यासाठी तुम्हाला थारसारखी पुढची सीट सारखी मागे-पुढे करत बसावी लागणार नाही. मागच्या सीटवर बसलेल्या लोकांना खूप आराम मिळतो. यामुळे थारपेक्षा जिम्नी आरामदायक एसयुव्ही बनते.