कार खरेदी करताय? जरा थांबा! नोव्हेंबरमध्ये लॉन्च होतायत 5 नव्या कार, बघा लिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:56 PM2023-10-30T12:56:43+5:302023-10-30T13:08:11+5:30

जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या 5 कारसंदर्भात...

देशात या वर्षभरात बऱ्याच नव्या कार लॉन्च झाल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत तर यांची संख्याच बरीच वाढली आहे. या लॉन्चमध्ये नव्या कार, अपडेटेड फेसलिफ्ट आणि स्पेशल एडिशनचा समावेश आहे. आता काही इतर मॉडेल्सदेखील बाजारात येण्यासाठी तयार आहेत. तर जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होणाऱ्या 5 कारसंदर्भात.

Mercedes-Benz GLE Facelift - फेसलिफ्टेड Mercedes-Benz GLE याच वर्षाच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. ती आता 2 नोव्हेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. अपडेटेड SUV मध्ये काही प्रमाणावर कॉस्मेटिक बदल आणि फीचर्स मिळतील. यात भारत-स्पेक मॉडेलमध्ये 2-लीटर आणि 3-लीटर डिझेल इंजिन ऑप्शन मिळण्याची शक्यता सर्वाधिक आहे. हिची किंमत 93 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होण्याची शक्यता आहे.

Mercedes-AMG C43 - येणाऱ्या 2 नोव्हेंबर रोजी अपडेटेड GLE सोबतच Mercedes C43 AMG देखील लॉन्च करेल. स्पोर्टी परफॉर्मेंस सेडानमध्ये 2-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन असू शकते. जे हिच्या आधीच्या पिढीत मिळणाऱ्या 3-लीटर इंजिनच्या तुलनेत अधिक पॉवरफुल असेल. C43 AMG ची किंमत 85 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होण्याची शक्यता आहे.

Tata Punch EV - ही कार टेस्टिंगदरम्यान अनेक वेळा दिसून आली आहे. या कारमध्ये Nexon EV चे काही डिझाइन एलिमेंट मिळू शकतात. ही कार दोन बॅटरी पॅक ऑप्शनसह येण्याची शक्यता आहे. Punch च्या इलेक्ट्रिक व्हर्जनची सुरुवातीची किंमत 12 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) जवळपास असू शकते.

5-door Force Gurkha - या कारचे फोटो अनेक वेळा समोर आले आहेत. ही कार ऑफ-रोडर प्रोडक्शनसाठी तयार आहे. Force ही कार नोव्हेंबर महिन्यात Maruti Jimny आणि Mahindra Thar ला टक्कर देण्यासाठी लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. हिची किंमत 16 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरू होण्याची शक्यता आहे.

Fourth-gen Skoda Superb - गेल्या काही दिवसांपूर्वी Skoda ने Superb भारतीय बाजारात बंद केली होती. आता ती पुन्हा परत येत आहे. कंपनीने नुकताच 2024 Superb चे डिझाइन स्केच केल्याचा खुलासा केला आहे. ही कार 2 नोव्हेंबरला जागतिक पातळीवर सादर केली जाऊ शकते. मात्र, ही कार भारतात पुढील वर्षात लॉन्च केली जाऊ शकते.