अत्याधुनिक फीचर्स, तंत्रज्ञानासह लाँच होणार नवी Maruti Alto; पाहा केव्हा होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 04:11 PM2021-09-24T16:11:08+5:302021-09-24T16:20:47+5:30

Maruti Suzuki Alto ही कार कंपनीची बेस्ट सेलिंग आणि ग्राहकांच्या सर्वात पसंतीची कार ठरली आहे.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची बेस्ट सेलिंग आणि सर्वात स्वस्त असलेली Maruti Alto ही नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. आता कंपनी नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच करण्याची तयारी करत आहे. अलीकडे, चाचणी दरम्यान या कारचं नेक्स्ट जनरेशन मॉडेल स्पॉट करण्यात आलं.

मीडिया रिपोर्ट्समधील माहितीनुसार कंपनी पुढील वर्षी जानेवारी महिन्यात जपानमध्ये ही नवीन अल्टो सादर करेल. यानंतर ती भारतीय बाजारात सादर केली जाईल. टेस्टिंगचं मॉडेल पूर्णपणे कॅमोफ्लेजन (कव्हर) होतं.

दरम्यान, जरी त्याच्या डिझाइनशी संबंधित काही गोष्टी उघड झाल्या आहेत, तरी असं सांगितलं जात आहे की कंपनी या नवीन कारमध्ये काही कॉस्मेटिक बदल करेल. कारच्या आतारातही थोडा बदल दिसून येऊ शकतो आणि Heartech प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आल्यानं याचं वजनही कमी असेल.

यात नव्यानं डिझाइन केलेले फ्रंट ग्रिल, हेडलॅम्प, ट्वीक केलेले बंपर आणि नवीन टेललॅम्प मिळेल. या कारची लांबी रुंदी पूर्वीच्या मॉडेल प्रमाणेच असेल. परंतु कारची उंची सध्याच्या मॉडेलपेक्षा अधित असू शकते.

या कारच्या केबिनमध्ये आणखी बदल दिसू शकतात. कंपनी त्यात 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देऊ शकते, जी अँड्रॉइड ऑटो आणि Apple कार प्लेशी जोडली जाऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.

फीचर्सच्या बाबतीत सांगायचं झालं तर नव्या Alto मध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कीलेस एंट्री, पॉवर विंडो, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल्स मिळू शकतात. या कारमध्ये सुरक्षिततेचीही काळजी घेतली जाणार आहे.

इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), ड्युअल एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, ड्रायव्हर आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमाइंडरसह असे फीचर्सही स्टँडर्ड फीचर्स म्हणून मिळू शकतात.

नव्या ऑल्टोच्या इंजिन क्षमतेबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. सध्याच्या मॉडेलमध्ये कंपनी 796cc की क्षमतेच्या इंजनाचा वापर करते. हे इंजिन 47 bhp ची पॉवर आणि 69 Nm चा टॉर्क जेनरेट करते.

नव्या आणि अॅडव्हान्स्ड तंत्रज्ञानामुळे ही कार अधिक चांगले मायलेज देऊ शकेल. सध्या या कंपनीनं या कारच्या लाँच बद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु नव्या अपडेट्सनुसार या कारची किंमत विद्यमान कारच्या किंमतीपेक्षा अधिक असू शकते आणि ती पुढील वर्ष लाँच केली जाऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत.