आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना शुभवार्ता समजणार, धनलाभ होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 07:46 IST2023-05-21T07:17:50+5:302023-05-21T07:46:33+5:30
Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या...

मेष
अतिशय अनुकूल असा कालखंड आपणास अनुभवायला मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्या समवेत मौजमजा करण्यासाठी वेळ द्याल. करमणुकीच्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. मनावरील ताण निघून जाईल. व्यवसायात भरभराट होईल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. जवळच्या सहलीला जाऊन याल. दूरच्या प्रवासाचा बेत ठरेल. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. कामाचे स्वरूप बदलेल, नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी दिसतील. नवीन ओळखी होतील.
वृषभ
धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावर प्रसन्न राहील. विविध मार्गांनी फायदे होतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे मार्गी लागतील. त्यात तुमचा चांगला फायदा होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. हाती घेतलेल्या महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल. जवळचे नातेवाईक, भावंडांसमवेत मजेत वेळ जाईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल. मात्र, त्यातून कामाचा ताण वाढेल. स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका.
मिथुन
प्रेमात सफलता मिळेल मनात आनंदी विचार राहतील. ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. प्रेमात असणाऱ्यांना अनुकूल प्रतिसाद मिळेल. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. अपेक्षेपेक्षा जास्त प्रमाणात यश व फायदा होईल. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. प्रवासाचे योग आहेत. वारसाहक्काने मिळणाऱ्या उत्पन्नाचा लाभ होईल.
कर्क
आपल्याला संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. चैनीवर पैसे खर्च करण्याकडे कल राहील. पुढे पैसे मिळतील असे गृहीत धरुन आज पैसे खर्च कराल, तर अडचणी वाढतील. त्यामुळे अंथरूण पाहून पाय पसरावे हे बरे. नोकरीत अचानक मोठी संधी मिळेल. बदलीची शक्यता आहे. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. मनात आनंदी विचार राहतील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. मात्र, आर्थिक कारणामुळे खटके उडू शकतात. त्यामुळे आर्थिक निर्णय परस्पर समन्वयाने घ्या.
सिंह
मुत्सद्दीपणाने वागा. सुरुवात थोडी ताणतणावाच्या वातावरणात होईल; पण मुत्सद्दीपणाने व संयमाने वागल्यास अडचणी राहणार नाहीत. सामाजिक कार्यात संयमाची भूमिका घ्या. फार विचार करून मनाला त्रास करून घेऊ नका. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. पैशाचा ओघ सुरु राहील. मात्र, चैनीवर पैसे खर्च करण्याकडे कल राहील. काहींना प्रवास घडून येतील. समारंभात सहभागी व्हाल. भावंडांना समजून घ्या. बोलण्याच्या ओघात अनावश्यक वाद टाळा.
कन्या
नवीन ओळखी होतील. त्यातून नवीन संधी मिळतील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. नवीन पद मिळू शकते. त्यात तुमचा फायदा होईल. घरात आनंदी वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. पाहुणे मंडळी येतील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो. भेटवस्तू प्राप्त होतील. मनावरील ताण कमी करण्यासाठी आवडत्या छंदासाठी आवर्जून वेळ काढा.
तूळ
तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. अनेक अडचणी, संकटे परस्पर दूर होतील. मौजमजा करण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. समाजात तुमचा गौरव होईल. लोक तुमची प्रशंसा करतील. कलाकार, खेळाडू यांना पुरस्कार जाहीर होतील. सतत लोकांच्या संपर्कात राहाल. नोकरीत तुमचे पारडे जड राहील. मोठ्या संधी मिळतील. घरी पाहुणे मंडळी येतील. मनात आनंदी विचार राहतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल.
वृश्चिक
कामाचा ताण राहील. संमिश्र ग्रहमान राहील. नोकरीत कामाचा ताण वाढेल. नवीन कामे अंगावर पडतील. मात्र शांतचित्ताने कामे करत राहिल्यास ती पूर्ण होतील. वैद्यकीय कारणासाठी पैसा खर्च होऊ शकतो. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. रहदारीचे नियम पाळा. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल.
धनु
दडपण निघून जाईल. योग्य व्यक्तींचा सल्ला मिळेल. आत्मविश्वासाने वाटचाल सुरु राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. व्यवसायात भरभराट होईल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. विवाहेच्छूना अनुकूल काळ आहे. चांगली स्थळे चालून येतील. समाजात तुमचा मान वाढेल. महत्त्वाची प्रकरणे काळजीपूर्वक हाताळा. लोकांच्या सदिच्छा तुमच्या पाठीशी राहतील.
मकर
नोकरीत कामाचा ताण राहील. कुणी तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. त्यादृष्टीने सावध राहा. चांगल्या मित्रमंडळीच्या सहवासात राहा. आर्थिक व्यवहार जपून करा. वाहन जपून चालवा. वाहनाच्या कागदोपत्रांची पूर्तता करून ठेवा. घरात खेळीमेळीचे वातावरण ठेवा. जुने वाद उकरून काढू नका. जीवनसाथी तुमच्या मर्जीनुसार वागेल. व्यवसायात भरभराट होईल. आवडत्या छंदासाठी आवर्जून वेळ काढा
कुंभ
नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडेल. सामाजिक क्षेत्रात तुमचा नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळेल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने प्रवास घडून येतील. तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. कार्यक्रमात सहभागी व्हाल. लोकांच्या भेटीगाठी होतील. खाण्या- पिण्याचे पथ्य पाळा. सकस पण हलकेफुलके पदार्थ खाणे योग्य.
मीन
चांगली साथ मिळेल. व्यवसायात गाडी रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न फलद्रूप होतील. नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. नवीन पद मिळेल. पगारवाढ व इतर सर्व सुविधा मिळतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. खाण्या- पिण्याची चंगळ राहील. मुलांचे कौतुक होईल. त्यांच्या प्रगतीला पूरक वातावरण राहील. समाजात तुमचा मान वाढेल. प्रसिद्धी होईल. - विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)