साप्ताहिक राशीभविष्य - १८ ते २४ सप्टेंबर २०२२, पितृपक्षाचा उत्तरार्ध; तुमच्यासाठी हा आठवडा कसा असेल, जाणून घ्या...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 10:06 IST2022-09-18T09:41:57+5:302022-09-18T10:06:02+5:30
Weekly Horoscope: कसा असेल तुमचा हा आठवडा, काय सांगते तुमची रास, जाणून घ्या

मेष - ग्रहमानाची अनुकूलता आपल्या बाजूने राहील. मनावरील दडपण निघून जाईल. त्यामुळे कामात लक्ष लागेल. भावंडांशी संपर्क राहील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. नोकरीत बदलाची चाहूल लागेल. नवीन संधी समोर येतील. व्यवसायात सतत कार्यरत राहावे लागेल. अभ्यासाचा फायदा होईल. तुमच्या हुशारीला वाव मिळेल. मुलांच्या प्रगतीच्या बातम्या कळतील घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे, जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रलंबित प्रकरणात यश मिळेल. मोठा लाभ होईल. टीप-रविवार, सोमवार, गुरुवार, शुक्रवार चांगले दिवस.
वृषभ - आर्थिक आवक चांगली राहील. योग्य कारणासाठी आर्थिक मदत मिळेल. काहींना प्रवास घडून येईल. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. त्यात तुमचा फायदा होईल. खाण्यापिण्याची चंगळ राहील. व्यवसायात भरभराट होईल. मोठी गुंतवणूक करताना जाणकारांचा सल्ला घ्यावा. घरी पाहुणे येतील. एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. नवीन संधी मिळेल. मुलांच्या यशामुळे आनंद होईल. योग्य व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
मिथुन - तरुण वर्गाला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. मालमत्तेची कामं होतील. जीवनसाथीची चांगली साथ राहील. भावंडांशी मधुर संबंध राहतील. कौटुंबिक कार्यक्रमात उत्साहाने सहभागी व्हाल. महत्त्वाचे निरोप येतील. जवळच्या प्रवासाचे योग येतील. व्यवसायात बरकत राहील. चांगल्या संधी मिळतील. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. सर्वांचे सहकार्य मिळेल. मनासारखे भोजन मिळेल. एकंदरीत सप्ताह अनुकूल राहील. टीप - रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस.
कर्क - यशदायक काळ आहे. मात्र धावपळ करावी लागेल. सप्ताहाची सुरुवात थोडी संथ गतीने होईल. मात्र एकदा कामे सुरू झाली की, विलक्षण झपाट्याने कामे मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल. मात्र थोडे गैरसमज होतील. धनलक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. अपेक्षेपेक्षा जास्त धनलाभ होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मिठाई आणली जाईल. मनासारखे भोजन मिळेल. व्यवसायात विक्री चांगली होईल. जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ होईल. टीप - बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
सिंह - विविध प्रकारचे लाभ होतील. आर्थिक आवक चांगली राहील. त्याच प्रमाणात खर्चदेखील कराल. प्रेमात यश मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरण्याच्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू देण्यास हरकत नाही. मनात आनंदी विचार राहतील. नोकरीमध्ये चांगली परिस्थिती राहील. प्रवासाचे योग येतील. आवडत्या लोकांच्या सहवासात याल. वडिलोपार्जित संपत्तीची कामं होतील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. टीप - रविवार, सोमवार शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
कन्या - नोकरीमध्ये अनुकूल घटना घडतील. नवीन बदल फायदेशीर ठरतील. घरी नातेवाईक, मित्रमंडळी येतील. जनसंपर्क चांगला राहील. अनेकांच्या सहकार्याने महत्त्वाचे काम मार्गी लागेल. आर्थिक आवक मनासारखी राहील. मात्र चैनीवप पैसा खर्च करण्याकडे कल राहील. मौजमजा करता येईल. जीवनसाथी तुमच्या मर्जीप्रमाणे वागेल. मुलांची प्रगती होईल. त्यामुळे उत्साह वाढेल. त्यांच्यासमवेत संवाद साधा. त्यांना करिअरबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल. यासाठी जाणकारांचा सल्ला घ्या. टीप -रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस
तुळ - स्वतंत्र व्यावसायिकांना चांगले यश मिळेल. मालाची विक्री चांगली होईल. मोठी ऑर्डर हाती येईल. भाग्याची चांगली साथ राहील. अडचणी दूर होतील. दगदग कमी होईल. नोकरीत अनुकूल घटना घडतील. नातेवाईकांच्या भेटी होतील. भेटवस्तू मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. आलेल्या पैशाचे योग्य नियोजन करा. मौजमजा करण्यासाठी पैसे खर्च कराल. पण थोडे सावधपणे पैसे खर्च केल्यास बचत होईल. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस.
वृश्चिक - सप्ताहाच्या सुरुवातीला काही अडचणी असतील. पण थोडा संयम ठेवला तर नंतर अडचणी दूर होतील. तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होईल. भाग्याची चांगली साथ राहील. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. सामाजात तुमचा गौरव होईल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील. चांगल्या संधी मिळतील. घरी पाहुणे येतील. एखादे कार्य घडेल. आर्थिक आवक चांगली राहील. सरकारी कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. टीप - मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस.
धनू - भाग्याची साथ राहील. मौजमजा करण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च कराल. जीवनसाथीचं चांगलं सहकार्य राहील. सप्ताहाच्य मध्यात वाहने जपून चालवा. प्रवासाचे नियोजन नीट करा. फार बेपर्वाई नको. नोकरीत अनुकूल परिस्थिती राहील. काहींना बढती मिळू शकते. प्रसिद्धी नावलौकीक वाढेल. मोठ्या संधी मिळतील. प्रसिद्धी मान सन्मान मिळेल. तुमच्या आई वडिलांना तुमच्या यशाचे कौतुक वाटेल. वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. टीप - रविवार, सोमवार, शनिवार चांगले दिवस
मकर - संमिश्र ग्रहमान आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला. आरोग्याची काळजी घ्या. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. जीवनसाथी चांगली साथ देईल. प्रेमप्रकरणात अपेक्षित प्रतिसाद मिळेल. भेटवस्तू देण्सास हरकत नाही. नशिबाची साथ राहील. अचानक धनलाभ होईल. लॉटरीचे एखादे तिकीट खरेदी करण्यास हरकत नाही. टीप - मंगळवार, बुधवार, शुक्रवार चांगले दिवस
कुंभ - विवाहेच्छुकांसाठी अनुकूल काळ आहे. मनासारखी स्थळे चालून येतील. थोड्याफार प्रयत्नात यश मिळेल. प्रेमात असणाऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळेल. किरकोळ कारणावरून गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेची कामं होतील. त्यात तुमचा फायदा होईल. जीवनसाथीशी मधूर संबंध राहतील. तब्येतीची काळजी घ्या. टीप - रविवार, सोमवार, शुक्रवार, शनिवार चांगले दिवस
मीन नोकरीत बदली होऊ शकते. कामात बदल लाभदायक ठरतील. काहींना मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. जीवनसाथी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. तुम्हीसुद्धा जीवनसाथीच्या कामात मदत केली पाहिजे. घरी पाहुणे येतील. घरी पाहुणे येतील. मुले अभ्यासात प्रगती करतील. त्यांचे कौतुक होईल. चांगल्या मित्रांच्या संगतीत राहा. व्यवसायात विक्री चांगली होईल. टीप - सोमवार, मंगळवार, बुधवार चांगले दिवस