Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 13:30 IST2025-10-17T12:45:16+5:302025-10-17T13:30:18+5:30

Shivaji Kardile : राहुरीचे भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते भाजपा आमदार शिवाजी कर्डिले यांचे आज ह्रदयविराकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय ६६ वर्षे होते. त्यांच्या निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. दूध उत्पादक शेतकरी, गावात सरपंच, आमदार, राज्यमंत्री असा त्यांचा प्रवास आहे. त्यांनी आधी गावात दूधाचा व्यवसाय सुरू केला होता.

पुढे कर्डिले यांनी गावातील राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला सरपंच पदावर आपला ठसा उमटवला. पुढे त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला.

सुरुवातीला कर्डिले यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि निवडून आले. यानंतर त्यांनी राहुरी विधानसभा मतदारसंघ झाल्यानंतर त्यांनी तिथून विजय मिळवला.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. या निवडणुकीत त्यांचा २०१ मतांनी पराभव झाला होता. पुढे २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय खेचून आणला.

त्यांनी अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि भाजपमध्ये काम केले आहे. अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढवली होती.

अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप हे आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई आहेत.