जलसंजीवनी जनजागृती सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:18 AM2021-07-28T04:18:41+5:302021-07-28T04:18:41+5:30

दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या परभणी शाखेच्या वतीने यावर्षीही या सप्ताहनिमित्त ...

Water Resuscitation Awareness Week | जलसंजीवनी जनजागृती सप्ताह

जलसंजीवनी जनजागृती सप्ताह

googlenewsNext

दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा सप्ताह साजरा केला जातो. भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या परभणी शाखेच्या वतीने यावर्षीही या सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अतिसारामुळे लहान मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. हे बालमृत्यू जलसंजीवनीच्या योग्य वापरामुळे टाळले जाऊ शकतात. या अनुषंगाने बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे. विविध ठिकाणी या निमित्ताने कार्यक्रम घेऊन पालकांना घ्यावयाची काळजी, या विषयी माहिती दिली जात आहे. बाळास सतत तहान लागणे, पाणी पिण्याचे प्रमाण वाढणे, त्वचा कोरडी वाटणे, बाळाचे वजन कमी होणे, डोळे खोल जाणे, डोळ्यातील अश्रूंचे प्रमाण कमी होणे, बाळाचे लघवीचे प्रमाण कमी होणे, अशी लक्षणे आढळल्यास बालकास जलसंजीवनी देणे आवश्यक आहे. सर्व शासकीय रुग्णालयातही पाकिटे उपलब्ध आहेत, असे बालरोगतज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप कार्ले यांनी सांगितले.

Web Title: Water Resuscitation Awareness Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.