नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:15 IST2020-12-29T04:15:02+5:302020-12-29T04:15:02+5:30

पूल धोकादायक परभणी : वसमत रस्त्यावरील राहटी येथील पूल धोकादायक झाला असून या पुलावरील खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी आहे. ...

Violation of rules | नियमांचे उल्लंघन

नियमांचे उल्लंघन

पूल धोकादायक

परभणी : वसमत रस्त्यावरील राहटी येथील पूल धोकादायक झाला असून या पुलावरील खड्डे बुजविण्याची नागरिकांची मागणी आहे. कठडेही गायब झाल्याने धोका वाढला आहे.

रस्त्याला पडल्या भेगा

परभणी : येथील पारदेश्वरनगर भागातील सिमेंट रस्ता खराब झाला आहे. या रस्त्याला मोठे तडे पडले असून या तड्यांमुळे वाहनांना अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मनपा प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी.

काम ठप्प

परभणी : शहरातील राजगोपालाचारी उद्यानातील जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून ठप्प पडले आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

ज्वारी पोटऱ्यामध्ये

परभणी : रबी हंगामातील ज्वारीचे पीक पोटऱ्यामध्ये असून येत्या १५ ते २० दिवसांत हे पीक निसवण्याच्या अवस्थेत येणार असून यावर्षी ज्वारीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Violation of rules