शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

शहरी भाग चिमण्यांसाठी प्रतिबंधितच; नैसर्गिक संतुलन बिघडण्याची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:13 IST

शहरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

ठळक मुद्देदरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो़ ग्रामीण भागात सद्यस्थितीला इतर पक्ष्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत चिमण्या

- प्रसाद आर्वीकर 

परभणी : निसर्ग चक्रामध्ये इतर प्राण्यांमध्ये चिमण्यांनाही तेवढेच महत्त्व असले तरी धकाधकीची जीवनशैली, वाढते सिमेंटीकरण आणि  प्रदूषणाचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर झाला आहे़ मागील काही वर्षामध्ये चिमणी संवर्धनासाठी जनजागृती झाल्याने ग्रामीण भागात चिमण्यांचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले असले तरी शहरी भाग मात्र अद्यापही चिमण्यांसाठी प्रतिबंधित असल्याचे दिसत आहे़ त्यामुळे शहरात चिमण्यांचा चिवचिवाट वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो़ या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील चिमण्यांच्या स्थितीचा आढावा घेतला असता, ग्रामीण भागात सद्यस्थितीला इतर पक्ष्यांच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत चिमण्या आढळत आहेत़ निमशहरी भागात हे प्रमाण बऱ्यापैकी असले तरी शहरी भागात मात्र चिमण्यांचा चिवचिवाट मागील काही वर्षांपासून बंद झालेला आहे़ निसर्ग चक्रामध्ये प्रत्येक प्राणीमात्राला त्याचे महत्त्व अबाधित आहे़; परंतु, वाढते शहरीकरण चिमण्यांसाठी धोकादायक ठरले़ त्यातच इंटरनेट, मोबाईल फोनसाठी जागोजागी उभारण्यात आलेल्या टॉवर्सचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर  दिसून आला़ त्यामुळे २००८ पर्यंत चिमण्यांचे प्रमाण घटलेलेच होते़ यात जनजागृती झाल्यानंतर हळूहळू चिमण्यांची संख्या वाढू लागली आहे़ पक्षीमित्र त्यासाठी पुढाकार घेत आहेत. परभणी शहरात काही पक्षीमित्र चिमण्यांसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसतात़  त्यात येथील प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधणे यांचे संपूर्ण कुटुंबच चिमण्यांसाठी झटत असते़ त्यामुळे त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरात चिमण्यांचा आवास वाढलेला आहे़ तर बोरी येथेही पक्षीमित्र अंभुरे  हे मागील अनेक वर्षांपासून चिमण्या संवर्धनासाठी प्रयत्न करीत आहेत़ शहरी भागात चिमण्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्नांची गरज निर्माण झाली आहे़ 

का घटले चिमण्यांचे प्रमाण ?बदलती जीवनशैली आणि रासायनिक कीटकनाशकांचा अनियंत्रित वापर यामुळे चिमण्यांच्या मूलभूत गरजाच नष्ट झाल्या़ तसेच सर्वत्र वाढलेली सिमेंटची घरे, घरटे करण्यासाठी उपलब्ध नसलेली जागा, मोबाईल टॉवरच्या लहरी यामुळे चिमण्यांचे प्रमाण घटले आहे़ 

जगभरात चिमण्यांच्या २५ प्रजातीपक्षीमित्रांनी केलेल्या अभ्यासात जगभरात चिमण्यांच्या २५ प्रजाती आढळल्या़ त्यामध्ये अरेबियन गोल्डन स्पॅरो, केप स्पॅरो, चेस्टनट स्पॅरो, डेसर्ट स्पॅरो, ग्रेट स्पॅरो,हाऊस स्पॅरो, लागो, इटालियन, नॉर्थन ग्रेहेड, पॅरोट बिल्ड, प्लेन बॅकड्, रुशेट, शैलेस, स्कोट्रा, सोमाली, स्पॅनिस आदी चिमण्यांच्या प्रजातींचा समावेश आहे़ त्यात परभणी जिल्ह्यामध्ये हाऊस स्पॅरो ही एकमेव प्रजाती आढळते, असे पक्षीमित्र अनिल उरटवाड यांनी सांगितले़ 

चिमण्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी  घरटे लावून आश्रय द्यावा, अंगणात, छतावर, गॅलरीत चिमण्यांसाठी पिण्याचे पाणी व खाद्य देण्याची व्यवस्था करावी़ हे घरटे घराच्या गॅलरीत किंवा बागेत लावल्यास चिमण्यांचा वावर वाढण्यास मदत होईल़-अनिल उरटवाड, पक्षीमित्र

टॅग्स :parabhaniपरभणीNatureनिसर्गforestजंगल