शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 15:48 IST

गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ झाला अपघात

गंगाखेड: अपघातग्रस्त झालेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ घडली. विठ्ठल गणपत लांडगे असे मृताचे नाव असून अपघातात त्याचा भाऊ जखमी झाला आहे. 

सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील विठ्ठल गणपत लांडगे ( ३२ ) व त्यांचा भाऊ अतुल गणपत लांडगे ( २६ ) हे दोघे भाऊ दुचाकीवरून ( क्रमांक एम एच २६ जे ५६१९ ) रात्री गंगाखेडकडे येत होते. गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ एक ट्रॉली अपघातग्रस्त झाली होती. मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान त्यांना अंधारात त्यांना अपघातग्रस्त ट्रॉली दिसली नाही ते त्यावर धडकले. यात विठ्ठल गणपत लांडगे याचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गणपत लांडगे गंभीर जखमी आहे. 

अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि बालाजी गायकवाड, सपोउपनि टी. टी. शिंदे, जमादार बाबुराव घरजाळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतुल लांडगेस पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत विठ्ठल लांडगेचा मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी नातेवाईकांनी फिर्याद न दिल्याने दि. २ मार्च रोजी दुपारपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणी