शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोघे ताब्यात; जिवंत काडतुसेही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2021 11:57 IST

Crime In Parabhani : आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची  गुप्त माहिती पोलिसांना मिळाली

पाथरी :  बेकायदेशीर रित्या आणि विनापरवाना देशी बनावटीचे पिस्टल ( Two in arrested with pistol) आणि ५ जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी पाथरी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई बुधवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास शहरातील आष्टी फाटा परिसरात करण्यात आली आहे.  गणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे ( रा बोरगव्हान ता पाथरी ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक १३ ऑक्टोबर रोजी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पाथरी येथे आले होते. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या सुमारास या पथकाला आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची  गुप्त माहिती  मिळाली. या माहितीवरून पाथरी येथील पोलीस उपनिरीक्षक जी. एन. कराड आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आष्टी फाटा टी पॉईंट येथे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. 

यावेळी गणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्टल आणि ५ जिवंत काडतूस आढळून आले. ४० हजार रुपये किंमतीचे पिस्टलची आणि २ हजार ५०० किंमतीचे काडतुस असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे कर्मचारी किशोर सुरेश चव्हाण यांच्या फिर्यदिवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. आर. बंदखडके  करत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारी