गंगाखेडमध्ये एकाच रात्री फोडली तीन दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST2020-12-25T04:14:42+5:302020-12-25T04:14:42+5:30

शहरातील कोद्री रस्त्यावर तहसील कार्यालय, पंचायत समिती, अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय आदी शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नेहमीच या मार्गावर मोठी ...

Three shops were blown up in one night in Gangakhed | गंगाखेडमध्ये एकाच रात्री फोडली तीन दुकाने

गंगाखेडमध्ये एकाच रात्री फोडली तीन दुकाने

शहरातील कोद्री रस्त्यावर तहसील कार्यालय, पंचायत समिती, अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालय आदी शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे नेहमीच या मार्गावर मोठी वर्दळ असते. याच भागातील संत गाडगेबाबा महाराज व्यापारी संकुलातील तीन दुकानांचे शटर लोखंडी सब्बलीने वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश करीत चोरी केली. प्रमोद चिंतामणराव कवठेकर यांच्या हरिओम किराणा दुकानातील काजू, बदाम, आक्रोड, खारीक, पिस्ता, अंजिरांची चोरी केली. तसेच १७ हजार रुपयांचा सुकामेवा आणि गल्ल्यातील रोख ८ हजार रुपये असा २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. असे आहे. याच संकुलातील एस.एस लटपटे यांच्या श्रद्धा बिअर शाॅपीचे शटर वाकवून चोरट्यांनी बीअरचे १५ बाॅक्स चोरून नेले. त्याचप्रमाणे गल्यातील रोख दहा हजार असा २७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. आहेत. या बिअर शॉपीचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरट्यानी फोडले. त्याचप्रमाणे रोहोन कॉम्प्युटर व फोटो या दुकानाचेही शटर वाकवून चोरट्यांनी चोरी केली आहे. तिन्ही दुकानांतील मिळून ६२ हजार रुपयांची चोरी झाली आहे. एकाच रात्री तीन दुकाने फोडल्याने व्यापाऱ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे.

Web Title: Three shops were blown up in one night in Gangakhed