कृषिपंप सुरु करण्यासाठी बटन दाबताच विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 19:50 IST2022-10-10T19:49:41+5:302022-10-10T19:50:30+5:30
शेतातील मोटार लावण्यासाठी शेतकरी गेला असता बसला विद्युत धक्का

कृषिपंप सुरु करण्यासाठी बटन दाबताच विद्युत धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू
गंगाखेड (परभणी) : तालुक्यातील मौजे हरंगुळ येथे शेतातील विहरीवरील विद्युत मोटार लावताना शाॅक लागून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता घडली. उत्तमराव भिमराव हाके ( ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
उत्तमराव हाके यांचे हरंगुळ शिवारात शेत आहे. आज सकाळी ते पिकास पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. विहिरीवरील मोटार सुरु करण्यासाठी बटन दाबताच त्यांना विद्युत शाॅक बसला. यामुळे ते खाली कोसळले. हे पहातच मुलाने धाव घेतली. शेजारील शेतकऱ्यांच्या मदतीने उत्तमराव यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
येथे डाॅक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी. टी. शिदे, होमगार्ड रामेश्वर थोरात यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला.