Parabhani Accident: परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 08:59 IST2026-01-10T08:59:02+5:302026-01-10T08:59:55+5:30
कार - दुचाकी अपघातात तीन वारकऱ्यांचा मृत्यू; परभणी- जिंतूर मार्गावरील झरी जवळील घटना

Parabhani Accident: परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
-अनिल जोशी
झरी (जि.परभणी) : कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आटोपून दुचाकीने जाणाऱ्या तीन वारकऱ्यांचा कार- दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. हभप.माऊली दिगंबरराव कदम (३०), हभप. प्रसादराव कदम (४५, दोघे रा. बोर्डी ता. जिंतूर), हभप.दत्ता माणिकराव कऱ्हाळे (३०, रा. मुडा, ता. जिंतूर) अशी मयताची नावे आहेत.
अधिक माहिती अशी की, माऊली कदम, दत्ता कराळे, प्रसादराव कदम हे तिघे परभणी तालुक्यातील पिंपळा येथील कीर्तन कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री एकच्या सुमारास कीर्तन सोहळा आटोपून दुचाकीने परभणी- जिंतूर मार्गाने बोर्डी गावाकडे निघाले. दरम्यान झरी जवळील लोअर दुधना डाव्या कालव्याच्या जवळ येतात त्यांच्या दुचाकीचा व कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्यातील बीट जमादार शंकर हाके यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना परभणी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांना मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच बोर्डी गावावर शोककळा पसरली.