डेंग्यूसदृश तापाने तालुका फणफणला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:22 IST2021-09-15T04:22:30+5:302021-09-15T04:22:30+5:30
पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात जाऊन पाणी दूषित झाले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा न झालेल्या सखल भागात साचलेल्या ...

डेंग्यूसदृश तापाने तालुका फणफणला
पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात जाऊन पाणी दूषित झाले आहे. तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा न झालेल्या सखल भागात साचलेल्या पाण्यातून उग्र वास सुटला आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला. जलजन्य दूषित पाण्याने उत्पन्न होणारे आजार वाढले आहेत. शहरात रस्त्यावर पाणी साचल्याने सर्वत्र घाण निर्माण झाली आहे. पावसाळ्यात जलजन्य आजाराची साथ येण्याचा संभाव्य धोका असताना यावर पूर्वनियोजित स्वच्छतेकडे ग्रामपंचायत, नगरपालिकेचे दुर्लक्ष झाले. परिणामी, गॅस्ट्रो, काॅलरा, टायफॉइड, काविळीसारखे दूषित जलजन्य आजार वाढले. अस्वच्छतेमुळे डेंग्यू,चिकनगुनिया, कीटकजन्य आजाराचे रूग्ण अधिक प्रमाणात आहेत. एक ते दहा वर्षे वय असणाऱ्या लहान मुलामुलींना ताप, सर्दी, खोकला इत्यादी आजार झाल्याने पालकांची बालरोगतज्ज्ञांकडे गर्दी अधिक आहे. खासगी रूग्णालयातील प्रशासनाकडे नाव नोंद केल्यानंतर दोन ते तीन तास तपासणीसाठी रुग्णालयात ताटकळत थांबण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.