शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ग्रामपंचायतींनो अभ्यास करा, गुण कमवा आणि निधी मिळवा; अनुदानासाठी नवे निकष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 10:48 IST

गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणाºया १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार

ठळक मुद्देग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत.

मानवत ( परभणी ) : गावाच्या विकासासाठी शासनाच्या तिजोरीतून मिळणा-या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी ग्रामपंचायतींना आता विद्यार्थ्याप्रमाणे गुण मिळवावे लागणार आहेत. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सादर प्रस्तावात हे निकष घोषित केले आहेत. 

ग्रामपंचायतींना गाव पातळीवर लोकसंख्येच्या प्रमाणात शासनाकडून गाव विकासासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीची तरतूद आहे. या निधीतून गावात विकासकामे करण्यात येतात. ग्रामविकास विभागाने आगामी तीन वर्षासाठी वार्षिक प्रस्ताव सादर केला आहेत. त्यानुसार चार मुद्यांच्या आधारे ग्रामपंचायतींना १०० पैकी गुण दिले जाणार आहेत. याच गुणांच्या आधारे मंजूर निधी लोकसंख्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात किमान ५० ते १०० टक्के वितरित केला जाणार आहे. वित्त आयोगाच्या २०१७-१८ ते २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावित सादरीकरणानुसार निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायतींनी त्यांच्या लेखी नोंदी ठेऊन त्यांचे आॅडीट करणे देखील आवश्यक आहे. लेखा परीक्षणातील नोंदीवरून ग्रामपंचायतीच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा वाढ अपेक्षित आहे. ग्रामपंचायतींनी आपला विकास आराखडा पूर्ण करून तो योजनेच्या पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. 

वित्त आयोगांतर्गत अगोदरच्या वर्षी सादर प्रस्तावात केलेल्या खर्चाचा तपशीलही क्षेत्र निहाय केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या संकेतस्तळावर दाखवावा लागणार आहे. त्यावरून गुण दिले जाणार आहेत. ग्रामपंचायतींनी आपल्या उत्पादनात वाढ केल्यास १० गुण, २५ ते ५० टक्के वाढ केल्यास १५ गुण, ५० टक्केपेक्षा जास्त वाढ केल्यास २० गुण दिले जाणार आहेत. प्रमाणित लेख्यावरून मागील वर्षाच्या १४ व्या वित्त आयोगांतर्गत पात्र बेसिक निधीच्या प्रमाणात उत्पादनाची टक्केवारी १० टक्केपर्यंत असल्यास २० गुण, १० ते २० टक्के असल्यास २० गुण, २० ते ३० टक्के असल्यास ३० गुण व ३० टक्के पेक्षा जास्त असल्यास ४० गुण देण्यात येणार आहेत.

मागील वर्षा ग्रामपंचायत पांदणमुक्त असेल तर ३० गुण, लसीकरण झाल्यास १० गुण या चार मुद्यांच्या आधारे त्या-त्या ग्रामपंचायतींना गुण दिले जाणार आहेत. १०० पैकी ४९ टक्केपर्यंत गुण प्राप्त झाल्यास लोकसंख्या व क्षेफळाच्या आधारे मंजूर निधीच्या ५० टक्के निधी, ५० ते ६० टक्के गुण मिळाल्यास ७० टक्के निधी, ६१  ते ७० गुण मिळाल्यास ८० टक्के निधी तर ७१ पेक्षा जास्त गुण मिळाल्यास १०० टक्के निधी ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यामुळे आता गाव करभाºयाला ग्रामपंचायतींच्या कामामध्ये सुधारणा करणे आवश्यक होणार आहे.

गाव पुढा-यांची वाढणार डोकेदुखीग्रामविकास विभागाचे उपसचिव एन.बी. रिंगणे यांनी ३ नोव्हेंबरला परिपत्रक काढून ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना २०१७ ते २०२० या आर्थिक वर्षातील निधीच्या वितरणाबाबतच्या निकषातील मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या सूचनेच्या अधीन राहून ग्रामपंचायतींना परफॉरमन्स निधी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना या अगोदर मोठ्या प्रमाणात १४ व्या वित्त आयोगाचा निधी थेट मिळत असल्याने ग्रा.पं. स्तरावरील राजकारणाला प्रतिष्ठा प्राप्त झाली होती. मात्र आता हा निधी मिळविण्यासाठी निकषाची अट घातल्याने गाव पुढा-यांची डोकेदुखी वाढली आहे. पुन्हा बघू असे रेटून बोलणाºया सरपंचांना ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासह काम दाखवावे लागणार आहे. 

सुधारणा करण्यास मदतग्रामपंचायतींनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाने गुणाचे निकष लावून दिले आहेत. निधी प्राप्त करण्यासाठी ग्रामपंचायती धडपड करतात. परिणामी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यास व सुधारणा करण्यास मदत होणार आहे.- शैलेंद्र पानपाटील, विस्तार अधिकारी पं.स., मानवत

टॅग्स :parabhaniपरभणी