नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संपवले जीवन, परभणीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 17:05 IST2025-07-30T16:55:51+5:302025-07-30T17:05:01+5:30
परभणी शहरातील गजानन नगर भागात घडली घटना

नीट परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याने संपवले जीवन, परभणीतील घटना
परभणी : नीट परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने त्याचा ताण घेऊन ऋषिकेश उद्धव शिंदे (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या घरी रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान गजानन नगर भागात घडली.
याबाबत मयताचे वडील उद्धव सुभाषराव शिंदे यांनी नवा मोंढा ठाण्यात खबर दिली. पूर्णा तालुक्यातील खडाळा येथील ऋषिकेश शिंदे हा विद्यार्थी परभणी शहरातील गजानन नगर भागात वास्तव्यास होता. नुकत्याच लागलेल्या नीट परीक्षेमध्ये कमी मार्क मिळाल्याने त्याचा ताण घेऊन ऋषिकेश याने घराच्या रूममध्ये लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद नवा मोंढा पोलिस ठाण्यात करण्यात आली. घटनास्थळी नवा मोंढा पोलिस पथकाने भेट देत पंचनामा केला.