लग्न सोहळा उरकून गावी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; गंगाखेड- परळी रस्त्यावरील अपघातात चौघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 09:06 PM2020-12-13T21:06:20+5:302020-12-13T21:07:00+5:30

accident : चुराडा झालेल्या ऑटोतील मृतदेह हायवा खाली फसल्याने रात्री साडे आठ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Spend time on young people returning to the village after the wedding; Four killed in Gangakhed-Parli road accident | लग्न सोहळा उरकून गावी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; गंगाखेड- परळी रस्त्यावरील अपघातात चौघे ठार

लग्न सोहळा उरकून गावी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; गंगाखेड- परळी रस्त्यावरील अपघातात चौघे ठार

googlenewsNext

गंगाखेड (परभणी ) : गंगाखेड शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर परळी रस्त्यावर करम पाटी जवळील जिनिंग समोर झालेल्या हायवा व ऑटोच्या अपघातात ऑटोतील चौघे ठार झाल्याची घटना दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातात ठार झालेले तरुण हे अंबाजोगाई येथील आहे. चुराडा झालेल्या ऑटोतील मृतदेह हायवा खाली फसल्याने रात्री साडे आठ वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आले.

सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड परळी रस्त्याने परत परळी मार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या रियर ऑटो क्रमांक एमएच २३ टीआर ३११ ला परळीकडून राख घेऊन गंगाखेडकडे येत असलेल्या हायवा क्रमांक एमएच २२ ए एन ५१२१ ने समोरासमोर जोराची धडक देऊन ऑटो रस्त्याखाली नेल्याने या अपघातात ऑटोचा चुराडा होऊन ऑटोतील विशाल बागवाले वय २० वर्ष, दत्ता भागवत सोळंके वय २५ वर्ष, आकाश चौधरी वय २३ वर्ष, ऑटो चालक मुकुंद मस्के वय २२ वर्ष सर्व रा. अंबाजोगाई हे चौघे जण जागीच ठार झाले आहे. अ

पघाताची माहिती समजताच सोनपेठ पोलीस ठाण्याचे सपोनि श्रीनिवास भिकाने, सपोउपनि देवराव मुंढे, पांडुरंग काळे, गणेश नाटकर, गोपाळ खंदारे, गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सपोनि राजेश राठोड, सपोउपनि टी. टी. शिंदे, पोलीस शिपाई चंद्रशेखर कावळे, सुग्रीव सावंत, कृष्णा तंबूड, होमगार्ड एस. जी. क्षिरसागर, रात्र गस्तीवर असलेले सपोउपनि दिलीप अवचार, सपोउपनि निवृत्ती मुंढे, पोलीस शिपाई जयराम दुधाटे, केशव मुंढे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन हायवा खाली सापडून चुराडा झालेला ऑटो व त्यात अडकलेल्या मयतांचे मृतदेह करम, निळा, वडगाव स्टेशन येथील ग्रामस्थ व अन्य लोकांच्या मदतीने रात्री ८:३० वाजता बाहेर काढून गंगाखेड येथील खाजगी रुग्णवाहिकेतून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविले. हायवा चालक फरार झाल्याने हायवा खाली सापडलेला ऑटो व त्यातील मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलीसांना व ग्रामस्थांना अथक परिश्रम करावे लागले.

Web Title: Spend time on young people returning to the village after the wedding; Four killed in Gangakhed-Parli road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.