धक्कादायक! पैसे न दिल्याने मुलाकडून पेट्रोल टाकून बापाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

By ज्ञानेश्वर भाले | Published: January 3, 2024 04:45 PM2024-01-03T16:45:09+5:302024-01-03T16:45:17+5:30

सेलूतील लक्कडकोट भागातील घटना; जखमी बापाची परभणी शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे

Shocking! An attempt was made by the boy to burn his father alive by pouring petrol on him | धक्कादायक! पैसे न दिल्याने मुलाकडून पेट्रोल टाकून बापाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक! पैसे न दिल्याने मुलाकडून पेट्रोल टाकून बापाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

सेलू : प्राथमिक माहीतीनुसार पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात मुलांने बापास पेट्रोलने पेटवून संपविण्याचा प्रयत्न केला. बाप लेखाच्या नात्याला काळीमा फासणारी दुर्दैवी घटना मंगळवारी रात्री साडेदहाच्या सेलू शहरातील लक्कडकोट भागात घडली. भाजलेल्या गंभीर जखमी बजरंग शहाणे यांची परभणी शासकीय रूग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे.

सेलू शहरातील लक्कडकोट परिसरातील अजय शहाणे यांने वडील बजरंग दत्तात्रय शहाणे यांचेकडे पैशाची मागणी केली. परंतु पैसे देण्यास नकार दिल्याने अजयने रागाच्या भरात वडील बजरंग शहाणे यांचे अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. त्यानंतर काही नागरिकांनी भाजलेल्या जखमी बजरंग शहाणे यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणले.

प्रथमोपचारा नंतर परभणी शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान घटनास्थळी प्रभारी पोलीस निरीक्षक विजय कांबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली. उपचार ठिकाणी जबाब नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

Web Title: Shocking! An attempt was made by the boy to burn his father alive by pouring petrol on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.