स्वतःवरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:55+5:302021-02-05T06:02:55+5:30

अंजली कोलाच्या यशाचे कौतुक करण्यासाठी जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबच्यावतीने ३१ जानेवारीला मैनापुरी मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता ...

Self-confidence is the key to success | स्वतःवरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

स्वतःवरील आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली

अंजली कोलाच्या यशाचे कौतुक करण्यासाठी जिंतूर रँडोनिअर्स सायकल क्लबच्यावतीने ३१ जानेवारीला मैनापुरी मंगल कार्यालयात दुपारी २ वाजता नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून ‘मिस इंडिया फायनॅलिस्ट’ पल्लवी जाधव, शिक्षणाधिकारी सुचिता पाटेकर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सायकलिस्ट रेखा रावले, युवारत्न किरण गीते, वाशिम रँडोनिअर्स प्रतिनिधी चेतन शर्मा, व्यापारी महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रिजगोपाल तोष्णीवाल, देवेंद्र भुरे आदींची उपस्थिती होती. मॉडेलिंग विश्वात आपले भवितव्य घडवण्याकरिता ज्या तरुणी आणि महिला प्रयत्नरत आहे अशा जिंतूरसह मराठवाड्यातील महिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे. यासाठी जिंतूर व इतर ठिकाणी ब्युटी पिजंट शो चे आयोजन करून महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार असल्याचे अंजली कोला-पोर्जे त्या म्हणाल्या. यावेळी जिंतूर रंडोनिअर्स सायकल क्लबच्या सदस्यांच्यावतीने अंजली कोला- पोर्जे हीचा सन्मानचिन्ह, मिसेस एशिया बँड आणि वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहेजाद पठाण यांनी केले. सत्कार समारंभाच्या यशस्वितेसाठी देवेंद्र भुरे, पवन कालापाड, दुर्गेश नहातकर, व्यंकटेश भुरे, यासीन खान, शेख शाहरुख, यज्ञेश मापारी, अजित गोरे, संदीप गजभारे, प्रमोद भालेराव आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Self-confidence is the key to success